मुंबई : वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमध्ये कासव खूप शुभ मानला जातो. भगवान विष्णूचा अवतार असलेल्या या कासवाला संपत्तीचे प्रतीकही मानले जाते. कासवाची अंगठी घातल्याने जीवनावर चांगला प्रभाव पडतो. मान्यता आहे की कासवाची अंगठी घातल्याने आयुष्यात शांती, सौभाग्य आणि जीवनात समृद्धी येते. परंतु अशा काही राशी आहेत ज्यांनी कासवाची अंगठी घालू नये अन्यथा त्यांचे नशिब दुर्दैवात बदलण्यात फारसा वेळ लागणार नाही. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येकाने कासवाची अंगठी (tortoise ring) घालू नये, कारण कासवाच्या अंगठीचा काही लोकांवर वाईट परिणाम होतो. म्हणून ते घालण्यापूर्वी एकदा ज्योतिषाचा सल्ला घ्या. ही अंगठी घातल्याने कोणते फायदे होतात आणि कोणत्या राशीने ही कासवाची अंगठी घालू नये, हे येथे जाणून घेऊ. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी घालू नये.
वास्तुशास्त्र आणि फेंगशुईनुसार मेष, वृश्चिक, मीन आणि कन्या राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी घालू नये. कासवाची अंगठी घालायची असेल तर ज्योतिषांचा सल्ला घेतल्यानंतरच घालावी. अन्यथा जीवनात अनेक संकटे येतील तसेच व्यवसायात, करिअरमध्ये देखील नुकसान होऊ शकते. या राशीचे लोक अंगठी घालण्याऐवजी घरात कासव ठेवू शकतात. त्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी ते.
1. जीवनातील सर्व समस्या दूर होतात.
2. व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढतो.
3. जीवनातील नकारात्मकता निघून जाते.
4. कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते.
5. भाग्य प्राप्त होण्यास मदत हाेते.
6. आयुष्यातील दु:ख दूर होतात.
7. माता लक्ष्मीची कृपा सदैव असते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)