Astrology: या राशींचे लोकं करतात वायफळ खर्च; काहींना होतो पश्चताप तर काही करतात कानाडोळा
पैसा आयुष्यात सर्वकाही नसतो पण पैशामुळेच (Money) माणसाच्या भौतिक गरजा पूर्ण होतात . पैशांमध्ये खेळणे आणि त्यात जगायला कोणाला आवडत नाही. मात्र ज्यांना पैशाची कदर असते त्यांच्याकडे पैसा-संपत्ती टिकते. याशिवाय पैसा म्हणजेच लक्ष्मी ही चंचल आहे. ती आपण कुठल्या मार्गाने कामविती आणि त्याचा वापर आपण शाशासाठी करतो यावर तिचे टिकणे आणि वाढणे अवलंबून असते. अनेकांना […]
पैसा आयुष्यात सर्वकाही नसतो पण पैशामुळेच (Money) माणसाच्या भौतिक गरजा पूर्ण होतात . पैशांमध्ये खेळणे आणि त्यात जगायला कोणाला आवडत नाही. मात्र ज्यांना पैशाची कदर असते त्यांच्याकडे पैसा-संपत्ती टिकते. याशिवाय पैसा म्हणजेच लक्ष्मी ही चंचल आहे. ती आपण कुठल्या मार्गाने कामविती आणि त्याचा वापर आपण शाशासाठी करतो यावर तिचे टिकणे आणि वाढणे अवलंबून असते. अनेकांना पैसे कमविण्यासाठी फार मेहनत करावी लागते तर अनेकांना तो कमी कष्टात मिळतो. यामागे अनेक समीकरणं आहेत, पण त्याचा वापर हा योग्य व्हावा असे सगळ्याच धर्मात सांगितले गेले आहे. काही लोक विचार न करता खूप पैसा खर्च करतात. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशींचे स्वभाव संगितिले आहे. त्यानुसार अशा 5 राशींबद्दल शास्त्रात सांगितले आहे जे पाण्याप्रमाणे पैसा खर्च करतात. काहींना याबद्दल पश्चताप होतो तर काही याकडे कानाडोळा करतात. जाणून घेऊया या राशींबद्दल.
- वृषभ रास- ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे स्वामी शुक्र ग्रह आहेत. त्यांना ऐशोआरामात जगणे आणि भौतिक सुख भोगणे खूप आवडते. बेहिशोबी पैसा खर्च केल्यामुळे यांच्याकडे जास्त पैसे वाचत नाहीत. जर यांनी एखादी गोष्ट खरेदी करण्याचा विचार केला तर ते खरेदी करतातच. अशी खरेदी करताना ते आपल्या बजेटचा विचार करत नाही. त्यामुळेच यांच्याकडे पैसा टिकत नाही.
- मिथुन रास- या राशीच्या व्यक्ती खूप शौकीन असतात. या आपल्या मित्रपरिवारावर खूप पैसा खर्च करतात. दिखावा करण्याच्या नादात ते बऱ्याचदा पैसे उधळतात. बुध ग्रह या राशीचा स्वामी मानला जातो. यासाठी हे लोक आपली बुद्धिमत्ता आणि चतुराईने खूप धन कमावतात. मात्र यांचा स्वभाव खर्चाळू असल्याने बचत करू शकत नाही. त्याबद्दल त्यांना कुठलाच पश्चताप नसतो.
- सिंह रास- ज्योतिषशास्त्रानुसार या राशीवर सूर्य देवाची कृपा राहते. यांना लक्झरी लाईफस्टाईलचा छंद असतो. त्यांना राजेशाही थाट आवडतो. हे लोक आपल्या सुख-सुविधेसाठी पाण्याप्रमाणे पैसा खर्च करतात. महागड्या गोष्टी खरेदी करणे आणि दिखावा करण्याच्या नादात यांच्याकडे बचत नसते.
- तूळ रास- या राशीचा स्वामी शुक्र ग्रह मानला जातो. या राशीच्या लोकांना एकीकडे हा ग्रह धन-दौलत प्रदान करण्यास मदत करतो दुसरीकडे यांना खर्च करायलाही भाग पाडतो. हे लोक आपल्यापेक्षा जास्त दुसऱ्यांवर जास्त पैसे खर्च करतात. याच कारणामुळे हे लोक पैशांची बचत करू शकत नाही. त्यांचा आज जगण्यावर विश्वास असतो. यांना भविष्याची अजिबात चिंता नसते.
- कुंभ रास- या राशीवर शनीचा प्रभाव पाहायला मिळतो. हे लोक खोटी शान दाखवणारे मानले जातात. समाजात आपला दिखावा करण्यासाठी तसेच नाक उंच राखण्यासाठी पैसा पाण्याप्रमाणे वाहवतात. यांच्याकडे थोडाजरी पैसा आला तरी खर्च सुरू करतात, नंतर त्यांना पश्चताप होतो.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)