Astrology : उद्या 22 जानेवारीला घरी अशाप्रकारे करा पूजा, पूर्ण होतील सर्व मनोकामना

| Updated on: Jan 20, 2024 | 1:58 PM

जेव्हा वैदिक परंपरेनुसार रामललाचा (Ramlala Puja) अभिषेक अयोध्येतील भव्य राम मंदिरात होणार आहे. हा सोहळा अनुभवण्यासाठी प्रत्त्येकालाच अयोध्येला जाणे शक्य नाही. मात्र तुम्ही घरच्याघरी प्रभू रामाची आराधना करून त्यांची कृपा प्राप्त करू सकता. घरीच कश्याप्रकारे पूजा करावी ते जाणून घेऊया.

Astrology : उद्या 22 जानेवारीला घरी अशाप्रकारे करा पूजा, पूर्ण होतील सर्व मनोकामना
राम पूजा
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : 22 जानेवारी 2024 हा रामभक्तांसाठी ऐतिहासिक दिवस असणार आहे. ज्या दिवसाची सर्व राम भक्त वर्षानुवर्षे वाट पाहत होते तो दिवस अखेर येणार आहे. जेव्हा वैदिक परंपरेनुसार रामललाचा (Ramlala Puja) अभिषेक अयोध्येतील भव्य राम मंदिरात होणार आहे. हा सोहळा अनुभवण्यासाठी प्रत्त्येकालाच अयोध्येला जाणे शक्य नाही. जर तुम्ही अयोध्येला जाऊ शकत नसाल, तर रामललाच्या अभिषेक दिनी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही घरी कोणत्या पद्धतीने त्यांची पूजा करू शकता आणि पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. याबद्दल जाणून घेऊया.

देवघाराची स्वच्छता करा

22 जानेवारी, रामललाच्या अभिषेक दिनी आपल्या घरातील देवघराची पूर्णपणे स्वच्छता करा. देवघरात कोणत्याही प्रकारची धूळ नसावी. त्यानंतर देवघरात ठेवलेल्या सर्व देवांचा पाणी व पंचांमृताने अभिषेक करा. प्रभू रामाच्या मूर्तीला किंवा फोटोला अभिषेक करा. स्वच्छ कपड्याने पूसावे. उत्तर आणि पूर्व दिशेमधील भाग ईशान्य कोपरा मानला जातो. घरातील देवघर या दिशेलाच असावे. त्यामुळे घराच्या ईशान्य कोपऱ्याच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.

हे सुद्धा वाचा

अशा प्रकारे करा प्रभूरामाची पूजा

  • देवघराची स्वच्छता केल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. आता एका चौरंगावर लाल कापड पसरवा आणि राम दरबार किंवा भगवान श्री रामाची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा.
  • प्रभू रामाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्रीरामांसमोर हनुमानजींची पूजा करा आणि त्यांना लाल वस्त्र अर्पण करा, कारण असे मानले जाते की हनुमानजींच्या पूजेशिवाय भगवान श्रीरामाचा आशीर्वादही मिळत नाही.
  • प्रथम भगवान रामाच्या मूर्तीला पाण्याने अभिषेक करा आणि नंतर पंचामृताने स्नान करा. त्यानंतर पून्हा स्वच्छ पाण्याने स्नान घाला.
  • आता प्रभू रामाला धूप, दिवा, फुले आणि तिलक अर्पण करा आणि प्रभू रामाच्या नैवेद्यात मिठाई आणि सुका मेवा ठेवा. रामजन्म स्तुतीने प्रभू रामाची पूजा सुरू करा.
  • प्रभू रामाची पूजा करताना तुम्ही रामरक्षा स्तोत्राचा पाठही करू शकता. राम स्तोत्र पठण केल्याने प्रभू रामाचा आशीर्वाद नेहमी साधकावर राहतो. प्रभू रामाच्या आरतीने पूजेची सांगता करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)