Astrology : आंघोळीच्या पाण्यात टाका चिमुटभर केसर, होतील अनेक लाभ

| Updated on: Nov 19, 2023 | 9:34 PM

केशराला ज्योतिष शास्त्रात खूप महत्वाचे स्थान आहे. प्रत्येक शुभ कार्यात केशराचा वापर केला जातो. केशर मिश्रीत टिळा लावल्यास तुम्हाला नशीबाची साथ मिळेल आणि शरीरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

Astrology : आंघोळीच्या पाण्यात टाका चिमुटभर केसर, होतील अनेक लाभ
केशर उपाय
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : आपण वडिलधाऱ्या लोकांकडून काही गोष्टी ऐकल्या आहेत, ज्यामुळे आपल्या जीवनात अनेक फायदे होतात. त्या गोष्टींचा स्वीकार केल्याने धनसंपत्तीची शक्यताही निर्माण होऊ शकते आणि तुमच्या जीवनात आनंद टिकून राहतो. असाच एक ज्योतिषीय उपाय (Astro Tips) म्हणजे केशर. पूजेत केशराचा वापर केल्याने जीवनात अनेक फायदे होतात. या गोष्टी पाण्यात मिसळून घेतल्यास जास्त फायदा होतो. ज्योतिषी पराग कुळकर्णी यांच्याकडून जाणून घेऊया की केशर पाण्याने स्नान केल्याने काय फायदे होतात.

चंद्र मजबूत होतो

ज्योतिष शास्त्रानुसार, पाण्यात केशर मिसळल्याने तुमचा चंद्र मजबूत होतो, ज्यामुळे तुम्ही जीवनात भावनिकदृष्ट्या संतुलित होता आणि स्पष्टता देखील वाढवू शकता. याच्या मदतीने तुम्ही आयुष्यात नेहमी पुढे जात राहाल.

ग्रहांची स्थिती मजबूत होते

जर तुमच्या पत्रिकेतील ग्रहांची स्थिती कमजोर असेल तर केशराच्या पाण्याने स्नान करावे. विशेषत: जर तुम्ही गुरुवारी या पाण्याने स्नान केले तर गुरूची स्थिती मजबूत होते आणि तुमचा बृहस्पति चांगला होतो. एवढेच नाही तर केशराच्या पाण्याने आंघोळ केल्याने इतर कोणत्याही घरातील नकारात्मक प्रभाव कमी करता येतो.

हे सुद्धा वाचा

नकारात्मक ऊर्जा निघून जाते

केशराला ज्योतिष शास्त्रात खूप महत्वाचे स्थान आहे. प्रत्येक शुभ कार्यात केशराचा वापर केला जातो. केशर मिश्रीत टिळा लावल्यास तुम्हाला नशीबाची साथ मिळेल आणि शरीरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

केशराच्या पाण्याने आंघोळ केल्याने शुध्दीकरण होण्यास मदत होते. आंघोळ करताना पाण्यात केशर टाकल्याने आंघोळीनंतरच आभा शुद्ध होते. नकारात्मक ऊर्जा तुमच्या जवळही फिरकत नाही. मन आणि मेंदूमध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)