मुंबई : हिंदू धर्मात माघी अमावस्या विशेष मानली जाते. माघ महिन्यातील अमावस्याला मौनी अमावस्या (Mouni Amavasya) असेही म्हणतात. या दिवशी मौनव्रत पाळणे तसेच स्नान करणे आणि दान करणे याला खूप महत्त्व आहे. मौनी अमावस्येला भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते. यंदा मौनी अमावस्या 9 फेब्रुवारी म्हणजेच आज आहे. याशिवाय मौनी अमावस्येला सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत आहे. सर्वार्थ सिद्धी योगात केलेले कार्य अनेक पटींनी अधिक फल देते. तसेच या काळात केलेल्या कामामुळे यश मिळते. मौनी अमावस्येला सर्वार्थ सिद्धी योगाची निर्मिती 4 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. चला जाणून घेऊया मौनी अमावस्येला सर्वार्थ सिद्धी योग कोणत्या राशीसाठी भाग्यवान आहे.
सिंह : सिंह राशीच्या लोकांसाठी मौनी अमावस्या खूप शुभ परिणाम देऊ शकते. या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. आर्थिक लाभ होईल. मानसिक तणावातून आराम मिळेल. शांतीचा अनुभव येईल. करिअरमध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात.
तूळ : तूळ राशीच्या लोकांसाठी मौनी अमावस्येला तयार होणारा सर्वार्थ सिद्धी योग सकारात्मक परिणाम देईल. या लोकांचे काम चांगले होईल. तुमची प्रशंसा होऊ शकते. नवीन काम सुरू करण्यासाठी उत्तम काळ आहे. उत्पन्न वाढू शकते. धार्मिक कार्यात रुची वाढेल.
मकर : मौनी अमावस्या मकर राशीच्या लोकांसाठी देखील शुभ असू शकते. नोकरीच्या ठिकाणी तुमची स्थिती सुधारेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील, ज्यामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे.
कुंभ : मौनी अमावस्येचा दिवस कुंभ राशीच्या लोकांना लाभ देईल. या लोकांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. सर्वांच्या सहकार्याने तुम्ही तुमचे काम चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. तुमची स्थिती मजबूत असेल. लाभ मिळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)