Astrology 2023 : शनिदेव 140 दिवस असणार वक्री अवस्थेत, जाणून घ्या कसा असेल परिणाम

| Updated on: Jun 17, 2023 | 4:20 PM

ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव वक्री अवस्थेत गेल्यानंतर अधिक शक्तिशाली होतील. त्यामुळे त्याचा परिणाम राशीचक्रावर दिसून येईल. चला जाणून घेऊयात राशीचक्रावर कसा परिणाम होईल ते..

Astrology 2023 : शनिदेव  140 दिवस असणार वक्री अवस्थेत, जाणून घ्या कसा असेल परिणाम
शनि 140 दिवस असतील वक्री अवस्थेत, या राशींना राहावं लागेल सावध
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं राशी परिवर्तन आणि त्यांची चाल खूप महत्त्वपूर्ण ठरते. नऊ ग्रहांमध्ये सूर्य आणि चंद्र हे दोन ग्रह कधीच वक्री होत नाहीत. तर राहु आणि केतु कायम वक्री अवस्थेत असतात. तर मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनि ठराविक कालावधीनंतर वक्री होतात आणि त्यानंतर मार्गस्थ होतात. शनिदेवांना न्यायदेवतेचा दर्जा देण्यात आला आहे.30 वर्षानंतर शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहेत. स्वराशीत असलेला शनि 140 दिवस वक्री अवस्थेत असणार आहे. यापूर्वी शनिदेव 1994 आणि 1995 मध्ये कुंभ राशीत असताना वक्री झाला होता. वक्री म्हणजे शनि उलट्या दिशेने मार्गक्रमण करणे असा होतो. शनिच्या या स्थितीमुळे राशीचक्रावर शुभ अशुभ परिणाम दिसून येईल.

शनिच्या वक्री अवस्थेत मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर परिणाम दिसून येईल. शनिदेव वक्री अवस्तेत अधिक शक्तिशाली होतात. त्यामुळे जातकाला चांगल्या वाईट परिणामांना सामोरं जावं लागतं. शनि 4 नोव्हेंबर 2023 नंतर मार्गस्थ होतील. पण या दरम्यान देश विदेशात नैसर्गिक संकटं आणि राजकीय उलथापलथीच्या घटना घडतील.

शनि सर्वात मंद गतीने मार्गक्रमण करतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे या काळात मकर, कुंभ, मीन, कर्क आणि वृश्चिक राशीच्या जातकांनी सावध राहणं गरजेचं आहे. मकर, कुंभ आणि मीन राशीच्या जातकांना साडेसाती, तर कर्क आणि वृश्चिक राशीच्या जातकांना अडीचकी सुरु आहे.

दुसरीकडे, शनिच्या वक्री स्थितीमुळे शुभ योगही निर्माण होत आहे. शनि कुंभ राशीत वक्री झाल्याने केंद्र त्रिकोण नावाचा शुभ योग तयार झाला आहे. यामुळे वृषभ, मिथुन आणि सिंह राशीच्या जातकांना चांगला परिणाम अनुभवायला मिळतील. तर मेष, तूळ, धनु , कन्या राशीच्या जातकांना संमिश्र परिणाम पाहायला मिळतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)