वृश्चिक राशीचा (Scorpio Zodiac) स्वामी ग्रह मंगळ आहे त्यामुळे या राशीच्या जातकांवर मंगळाची विशेष कृपा असते. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला धैर्य आणि उर्जेचा कारक मानले जाते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा ग्रह बलवान असतो तो शक्तिशाली, प्रभावशाली, धैर्यवान आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असतो. अशा लोकांचे व्यक्तिमत्व (Personality) खूप मजबूत असते. मंगळामुळेच या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व खूप प्रभावशाली असते. हे लोक प्रबळ इच्छाशक्तीचे असतात. या राशीचे लोक आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे चांगले जाणतात. एकदा का एखाद्या गोष्टीचा हट्ट धरला की, मग ते पूर्ण करूनच ते दम घेतात. बऱ्याचदा त्यांचा स्वभाव रागीट असतो. त्यांना कुणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही. वृश्चिक राशीचे जातक प्रचंड स्वाभिमानी असतात.
वृश्चिक राशीचे जातक दृढ इच्छाशक्ती आणि दृढनिश्चयी असतात. एकदा त्यांनी जे काम करायचे ठरवले ते पूर्ण करूनच श्वास घेतात. त्यांचे जीवन संघर्षांनी भरलेले असते पण ते घाबरत नाहीत. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला ते सामोरे जातात. वृश्चिक राशीचे जातक बुद्धिमान असतात. तसेच त्यांची कल्पनाशक्ती खूप चांगली असते. ते कठोर परिश्रम करण्यास सैदव तयार असतात. ते सैन्य, पोलीस, उच्च प्रशासकीय अधिकारी, गणितज्ञ, पत्रकार, लेखक, सिनेमा इत्यादी क्षेत्रात यशस्वी होतात.
ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू पासून सुरु होत असेल त्यांची राशी वृश्चिक असते. ही राशीचक्रातील आठवी राशी आहे. या राशीचे चिन्ह विंचू असून ही जलतत्त्वाची राशी आहे. या राशीचा स्वामी मंगळ आहे.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)