Marathi News Rashi bhavishya Astrology Suffering from financial problems These remedies in astrology will give you solion
Astrology: आर्थिक समस्येने त्रस्त आहात? जोतिषशास्त्रातल्या या उपायांनी मिळेल समाधान!
प्रत्येक व्यक्तीसाठी घराहांचा प्रभाव हा वेगवेगळा असतो. ज्यांच्यासाठी हा नकारात्मक असतो त्याला ग्रहदोष म्हणतात. कुंडलीत ग्रहदोष असल्यास शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक साम्यांना तोंड द्यावे लागते. यातून बाहेर निघण्यासाठी जोतिषशास्त्रात काही उपाय सुचविण्यात आले आहेत.
जोतिषशास्त्र
Image Credit source: Social Media
Follow us on
Astrology: आयुष्यात प्रत्येकालाच सुख हवे असते. प्रत्येकालाच चैनीत आणि आनंदात जगायचे असते, पण अनेकांच्या जीवनात संकटं ही पाचवीला पुजलेली असतात. बऱ्याचदा ग्रहांच्या नकारात्मक ऊर्जेमुळे किंवा पत्रिकेत उत्पन्न झालेल्या ग्रह दोषांमुळे संघर्षाचा सामना करावा लागतो. यावर जोतिषशास्त्रात(astrology tips) काही उपाय सुचविण्यात आलेले आहेत. याचे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनातील समस्या दूर होतात आणि सुखी जीवन जगणे शक्य होते. जोतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या जीवनावर ग्रहांचा प्रभाव पडतो. प्रत्येक व्यक्तीसाठी घराहांचा प्रभाव हा वेगवेगळा असतो. ज्यांच्यासाठी हा नकारात्मक असतो त्याला ग्रहदोष म्हणतात. कुंडलीत ग्रहदोष असल्यास शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक साम्यांना तोंड द्यावे लागते. यातून बाहेर निघण्यासाठी जोतिषशास्त्रात काही उपाय सुचविण्यात आले आहेत.
आर्थिक समस्येवर जोतिषशास्त्रातले उपाय
ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्हाला आर्थिक संकटातून बाहेर पडायचे असेल तर रविवारी औदुंबराच्या वृक्षाची पूजा करा, झाडाला डोकं टेकवून नमस्कार करा व झाडाजवळ एक विड्याचे पान, सुपारी आणि पैसा ठेवा. आर्थिक संकटाऊन बाहेर निघण्यासाठी जोतिष शास्त्रात हा उपाय सुचविण्यात आला आहे.
जोतिषशास्त्रात दिशांना विशेष महत्त्व आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या बसण्याची दिशा लक्षात घ्या. दक्षिणेकडे तोंड करून बसू नये. शक्यतो मुख पूर्वेकडे असावे. काही कारणास्तव ते शक्य नसल्यास दक्षिण दिशा सोडून कुठल्याही दिशेला तोंड केल्यास चालते.
रोज आंघोळ झाल्यानंतर 28 वेळा गायत्री मंत्राचा जप करावा आणि रविवारी 11 वेळा विष्णूचा जप करावा. यामुळे आर्थिक संकट तर दूर होतेच शिवाय नात्यातला दुरावा, आरोग्याची समस्या दूर होते आणि मानसिक शांतीसुद्धा लाभते.
पैसे कमविण्यासाठी जे काम करीत आहात त्यातून नकारात्मकता निर्माण होत असेल किंवा इतरांना हानी होत असेल तर ते काम बदला. जोतिषशास्त्रानुसार आपण ज्या मार्गाने पैसे कामवितो त्यावर आपली बरकत अवलंबून असते.
हे सुद्धा वाचा
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)