मुंबई : वैदिक ज्योतिष गणनेमध्ये, ग्रह किंवा नक्षत्राच्या राशीच्या चिन्हात बदल करणे खूप महत्वाचे मानले जाते. ठराविक कालावधीनंतर सर्व ग्रह एक राशी सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. हिंदू कॅलेंडरनुसार, सूर्य देव 16 डिसेंबर रोजी दुपारी 3:45 वाजता धनु राशीत प्रवेश करेल. धनु राशीत सूर्याच्या प्रवेशामुळे (Sun Transit) अनेक राशींचे भाग्य उजळू शकते. इतकेच नाही तर सूर्यदेव दर महिन्याला आपली हालचाल बदलतात आणि 30 दिवस एका राशीत राहतात. ज्योतिषी पराग कुळकर्णी यांच्या मते ग्रहांचा राजा सूर्यदेव 16 डिसेंबरला धनु राशीत प्रवेश करेल. धनु राशीत सूर्य देवाच्या प्रवेशामुळे त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसणार आहे. सूर्य देवाला ग्रहणांचा राजा म्हटले जाते आणि जेव्हा सूर्य देव एक राशी सोडून दुसर्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा प्रभाव ज्योतिषशास्त्रीय गणनेत खूप जास्त मानला जातो. सूर्याच्या राशीत बदलामुळे अनेक राशीच्या लोकांना व्यावसाय आणि नोकरीत खूप फायदा होईल.
मेष : मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याची रास बदलणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अध्यात्माकडे कल झपाट्याने वाढेल, समाजात मान-सन्मान वाढेल, पद-प्रतिष्ठा वाढेल, बराच काळ अडकलेला पैसा वसूल होईल, व्यवसाय वाढेल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील.
मीन : सूर्याच्या राशीत बदलामुळे मीन राशीच्या लोकांच्या करिअर आणि नोकरीत बरेच बदल होतील. नवीन संधी शोधणाऱ्या लोकांसाठी यशाचे अनेक मार्ग प्रशस्त होतील. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी उच्च अधिकार्यांचे सहकार्य मिळेल.
धनु : सूर्याच्या रासातील बदल धनु राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. अध्यात्माकडे कल राहील, वैवाहिक जीवनात गोडवा येईल, कुटुंबासोबत वेळ जाईल, खूप दिवसांपासून रखडलेले काम पुन्हा सुरू करता येईल.
मिथुन : सूर्य धनु राशीत प्रवेश करत असल्याने मिथुन राशीच्या लोकांच्या भाग्यात बदल होईल. समाजात प्रतिष्ठा वाढेल, खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल, वैवाहिक जीवनात गोडवा राहील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)