मुंबई : सूर्यदेव 14 एप्रिलला मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करणार आहेत, याला मेष संक्रांत म्हणतात. हिंदू धर्मात सूर्याला देव मानले जाते. ज्योतिषशास्त्रातही सूर्याला (Sun Transit) सर्वात जास्त महत्त्व दिले गेले आहे. त्याला ग्रहांमध्ये राजा म्हणतात. यावेळी राहू आधीच मेष राशीत आहे. म्हणूनच 14 एप्रिल रोजी राहू आणि सूर्याचा संयोग मेष राशीत तयार होईल. सूर्याला शक्ती, वडिलांची भूमीका बजावणारा मानले जाते. याउलट, राहु कोणत्याही ग्रहाशी जुळला तरी त्याचा प्रभाव वाढतो. मेष राशीत सूर्य आणि राहूच्या संयोगामुळे ग्रहण योग तयार होणार आहे. जाणून घेऊया की सर्व राशींवर सूर्य आणि राहूच्या संयोगामुळे तयार होणाऱ्या ग्रहण योगाचा काय परिणाम होईल.
मेष राशीत हा ग्रहण योग तयार होणार आहे. या संयोगामुळे तुमचा हजरजबाबीपणा आत्मविश्वासात वाढू शकतो. सरकारी आणि राजकीय लोकांना फायदा होऊ शकतो. परंतु, भागीदारीत तुम्हाला अडचणी येऊ शकतात.
वृषभ राशीच्या बाराव्या घरात हा ग्रहण योग तयार होणार आहे. यावेळी तुम्हाला मानसिक तणाव असू शकतो. आरोग्याची विशेष काळजी घ्या. अनियंत्रित खर्चावर नियंत्रण ठेवा.
मिथुन राशीमध्ये हा ग्रहण योग अकराव्या भावात म्हणजेच इच्छापूर्तीच्या घरात तयार होणार आहे. या काळात तुम्हाला सर्व प्रकारे फायदा होईल. सरकारी कामातही तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे.
कर्क राशीत हा ग्रहण योग दशम भावात म्हणजेच कर्माच्या घरात तयार होणार आहे. यावेळी नोकरीच्या निमित्ताने प्रवासाची शक्यता निर्माण होत आहे. मात्र, प्रवासादरम्यान आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला तुमचे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करावे लागतील. सर्व कामात चांगले लक्ष द्या.
सिंह राशीच्या नवव्या घरात हा ग्रहण योग तयार होणार आहे. धार्मिक प्रवासाची शक्यता निर्माण होत आहे. पण वडिलांसोबतही मतभेद होऊ शकतात. घरातील मोठ्यांना मान द्या. आणि सर्वांचे आशीर्वाद जरूर घ्या.
कन्या राशीसाठी हे संक्रमण आठव्या भावात होणार आहे. यावेळी सासरच्या मंडळींकडूनही मतभेद होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पैशाचे व्यवहारही टाळावेत. कोणत्याही प्रकारच्या शारीरिक वेदनांकडे दुर्लक्ष करू नका.
तूळ राशीसाठी हे संक्रमण सप्तम भावात होणार आहे. यावेळी कौटुंबिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. यावेळी सर्व निर्णय काळजीपूर्वक घ्या. जोडीदाराशी चांगले वागा. हा काळ तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. यासोबतच 22 एप्रिलला ग्रहण योगासह चांडाळ योगही तयार होणार आहे. त्यामुळे पुढील 1 महिना काळजी घ्यावी लागेल. नवीन भागीदारी करताना सावधगिरी बाळगा.
वृश्चिक राशीसाठी हे संक्रमण सहाव्या भावात होणार आहे. यावेळी तुम्ही तुमच्या शत्रूंवर वर्चस्व गाजवाल. कौटुंबिक सहकार्य मिळेल. ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
धनु राशीचे हे संक्रमण पाचव्या घरात होणार आहे. यावेळी तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो. यावेळी अभ्यासात अडचणी येऊ शकतात. प्रेमात अडचण येऊ शकते. फसवणुकीलाही सामोरे जावे लागू शकते. कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.
मकर राशीसाठी हे संक्रमण त्यांच्या चौथ्या घरात होणार आहे. कुटुंबात मतभेद होऊ शकतात. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. यासोबतच तुम्हाला व्यवसायात तणावाचा सामना करावा लागू शकतो. काही लोक तुमचे नुकसान देखील करू शकतात. व्यवहारात सावध राहा.
कुंभ राशीमध्ये हे संक्रमण तृतीय घरामध्ये म्हणजेच पराक्रमात होणार आहे. यावेळी धैर्य वाढेल. धार्मिक यात्रा होण्याची शक्यता आहे. आपल्या कामाची जाणीव करून द्या.
मीन राशीसाठी हे संक्रमण दुसऱ्या घरात होणार आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आपले वर्तन चांगले ठेवा. यावेळी धनहानी देखील होऊ शकते. नवीन व्यवहार करताना काळजी घ्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)