शुभ संकेत
Image Credit source: Social Media
मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) शुभ आणि अशुभ संकेत यांना विशेष महत्त्व आहे. धर्म ग्रंथातदेखील या शुभ संकेतांचा उल्लेख आढळतो . आज आपण अशाच काही शुभ संकेताबद्दल (Lucky signs) जाणून घेत आहोत जे सकाळी दिसल्यास किंवा अनुभवायला आल्यास शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला सकाळी काही गोष्टी दिसल्या तर त्या पाहणे खूप शुभ असते. असं म्हणतात की, तुम्ही सकाळी काही महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि तुम्हाला या गोष्टी दिसल्या तर समजून घ्या की तुमचे काम यशस्वी होणार आहे.
- पक्ष्यांचा किलबिलाट: सकाळी डोळे उघडताच पक्ष्यांचा किलबिलाट ऐकणे खूप शुभ असते. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकणे म्हणजे तुमचा दिवस खूप शुभ आणि यशस्वी होणार आहे.
- मंदिरातील घंटांचा आवाज: ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर मंदिरातील घंटा ऐकू आल्यास ते खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ असा की, लवकरच तुम्हाला तुमच्या प्रियजनांकडून काही चांगली बातमी मिळेल आणि घरात आनंद येईल.
- शंख, सुपारी, पांढरे फूल, हत्ती पहाटे पाहणे शुभ असते. हे पाहिल्यास धनाची देवता कुबेर तुमच्यावर प्रसन्न होतो आणि लवकरच तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता वाढते.
- महिलेला झाडू मारताना: ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या शुभ कामाच्या वेळी एखादी महिला रस्ता साफ करताना किंवा झाडू मारताना दिसल्यास ते खूप शुभ मानले जाते. यामुळे तुम्हाला कामात यश मिळण्याचे संकेत मिळतात आणि असे मानले जाते की हे पाहून व्यक्तीची कोणतीही मोठी समस्या दूर होते.
- गायीचं दर्शन: पहाटे घरातून बाहेर पडताच जर तुम्हाला गाय दिसली तर ती खूप शुभ मानली जाते. विशेषत: तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी निघालो असता, गाय दिसणे शुभ संकेत देते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)