मुंबई, ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) ग्रहांची स्थिती आणि नक्षत्र बदलणे ही सर्वात मोठी घटना मानली जाते. त्यामुळे प्रत्येक राशीच्या जीवनावर खोलवर प्रभाव पडतो. त्याचप्रमाणे वर्षाच्या शेवटी बुध ग्रह आपली राशी बदलणार आहे. बुध हा बुद्धिमत्ता, शक्ती आणि कला कौशल्यांचा स्वामी मानला जातो. तो कन्या आणि मिथुन राशीचा स्वामी मानला जातो. यासोबतच बुध हा ग्रह सर्व ग्रहांचा राजा मानला जातो आणि मकर ही अग्नी तत्वाची राशी मानली जाते.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुधाने डिसेंबर महिन्यात तीनदा आपली स्ठिती बदलली आहे. 28 डिसेंबर रोजी बुध तिसऱ्यांदा ग्रहांची स्थिती बदलून मकर राशीत प्रवेश करणार आहे. पहाटे 04.05 वाजता बुध मकर राशीत प्रवेश करेल. चला जाणून घेऊया बुध ग्रहाच्या या संक्रमणामुळे कोणत्या राशींना माेठा लाभ होणार आहे.
बुधाचे हे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी खूप चांगले परिणाम देणारे आहे. मेष राशीच्या लोकांसाठी प्रगतीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सर्व कामे यशस्वी पार पडतील. आपल्या भाषणाने सर्वांची मने जिंकाल. मेष राशीच्या लोकांमध्ये जोखीम घेण्याची क्षमता वाढेल. जर तुम्ही कठोर परिश्रम केले तर तुम्हाला व्यवसायातही चांगले परिणाम मिळतील. यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. कौटुंबिक सहकार्य मिळेल. करिअरसाठी हा काळ चांगला जाणार आहे. रखडलेले पैसे मिळू शकतात.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण सकारात्मक परिणाम देईल. वृषभ राशीच्या लोकांचे प्रेमसंबंध चांगले राहतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवेल. तुमचे प्रेम जीवन खूप मजबूत असेल. एकमेकांवरील विश्वास वाढेल. यावेळी तुम्हाला पैशाशी संबंधित बाबींमध्ये फायदा होऊ शकतो. व्यवहारातून लाभ होण्याचीही शक्यता आहे. मुलांकडून काही आनंदाची बातमी मिळण्याचीही शक्यता आहे.
कर्क राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण फलदायी ठरणार आहे. या काळात नोकरीच्या ठिकाणी प्रगतीची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमचे शत्रू तुमच्या विरोधात नक्कीच काही योजना आखतील, पण तुम्ही त्यांचा पूर्ण ताकदीने सामना कराल. यावेळी तुम्ही कठोर परिश्रम कराल आणि लोक तुमचे कौतुक करताना दिसतील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही चांगले निकाल मिळू शकतात.
बुधाचे हे संक्रमण मकर राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळेल. या संक्रमणाच्या प्रभावामुळे कुटुंबात सुरू असलेले मतभेद संपतील. यासोबतच तुम्हाला संपत्तीचा लाभही मिळू शकतो. जर तुम्हाला एखादे वाहन खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी हा काळ अतिशय शुभ आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला परिणाम देणारा असेल. मात्र यावेळी आरोग्याची विशेष काळजी घ्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)