Astrology : मीन राशीत संपली शुक्र आणि शनिची युती, या राशीच्या लोकांसाठी येणार भाग्याचे दिवस

| Updated on: Mar 31, 2023 | 9:15 AM

ज्योतिषशास्त्रात ग्रहांची युती महत्वाची मानली जाते. ग्रहांच्या युतीचा काही राशींवर शुभ परिणाम होतो तर काहींवर अशुभ परिणाम होतो.

Astrology : मीन राशीत संपली शुक्र आणि शनिची युती, या राशीच्या लोकांसाठी येणार भाग्याचे दिवस
राशी भविष्य
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : सूर्य आणि शनीला ज्योतिषशास्त्रात (Astrology) एक महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे आणि या दोघांची स्थिती प्रत्येक राशीच्या व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करते. न्यायाची देवता शनिदेव 17 जानेवारी 2023 पासून कुंभ राशीत विराजमान होत असून वर्षभर ते या राशीत राहतील. दुसरीकडे,  सूर्यदेव यांनी 13 फेब्रुवारी 2023 रोजी कुंभ राशीत प्रवेश केला होता. अशा स्थितीत पिता-पुत्र म्हणजेच शनि-सूर्य यांचा संयोग कुंभ राशीत दिसत होता, परंतु 15 मार्च 2023 रोजी सकाळी 06.13 मिनिटांनी सूर्याने मीन राशीत प्रवेश केला आहे, ज्यामुळे 3 राशींच्या जातकांना शुभ फळ मिळेल.

मेष

मेष राशीच्या लोकांना सूर्य आणि शनीचा संयोग संपल्यावर शुभ परिणाम मिळतील. कुंभ राशीत शनिदेवाचा उदय आणि सूर्याचा द्वितीय राशीत प्रवेश यामुळे लाभाचे योग निर्माण होतील. समाजात मान-सन्मान, कीर्ती व प्रतिष्ठा वाढेल. परदेश प्रवासात लाभ होऊ शकतो. शेअर बाजारात धनलाभ होऊ शकतो.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांनाही रवि आणि शनी युतीच्या समाप्तीमुळे आर्थिक लाभ मिळू शकतात. शनिदेवाने कुंडलीत शश राजयोग आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार केला आहे, ज्यामुळे आर्थिक लाभ होईल. तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते तुम्हाला परत मिळू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नोकरी मिळू शकते. नोकरदारांना पगारवाढ आणि पदोन्नती मिळण्याचीही शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

कुंभ

कुंभ राशीमध्ये सूर्य आणि शनीचा संयोग संपत आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होतील. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे, त्यामुळे तुमच्या धनाच्या घरात सूर्य स्थित आहे. मीन राशीच्या लोकांच्या कुंडलीतही शश आणि मालव्य राजयोग तयार होत असल्याने या राशीच्या लोकांना आर्थिक लाभही मिळू शकतो. व्यापारी वर्गाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वाहन आणि मालमत्ता खरेदीची योजना बनू शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)