ग्रहांच्या चालीमुळे काही राशींना (Horoscope) शुभ तर काही राशींना अशुभ परिणाम मिळतात. साप्ताहिक कुंडली ग्रहांच्या (Planet) हालचालीवरून काढली जाते. जूनचा शेवटचा आठवडा ग्रहांच्या हालचालीमुळे काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. जूनचा शेवटचा आठवडा कोणत्या राशीसाठी खूप फलदायी असणार आहे.
- मेष- तुम्हाला तुमच्या नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठा वाढू शकते. वाहन खरेदी करू शकता. आर्थिक स्थिती सुधारेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. व्यवहारातून लाभ होईल. माता लक्ष्मीची कृपा राहील.
- सिंह- राशीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्न वाढल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. जोडीदारासोबत वेळ घालवाल, त्यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहील. शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी असणार नाही. या काळात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. आरोग्य चांगले राहील.
- वृश्चिक- रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढू शकते. तुमच्या कामाचे कौतुक होईल. कामात यश मिळेल. नोकरी-व्यवसायासाठी वेळ शुभ आहे.
- धनु- राशीला शुभ परिणाम मिळतील. या काळात तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. नवीन काम सुरू करू शकाल. व्यापाऱ्यांना फायदा होऊ शकतो. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. पैसा आणि नफा होईल, ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत लोकांसाठी काळ शुभ म्हणता येईल.
- मीन- या राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत होईल. प्रतिष्ठा आणि पदात वाढ होईल. नोकरी-व्यवसायात फायदा होत आहे, शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांना शुभ परिणाम मिळतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)