Astrology: बाप्पांच्या आगमनासोबतच होत आहे शुक्राचे गोचर, या चार राशींना होणार विशेष लाभ

| Updated on: Aug 30, 2022 | 3:08 PM

ज्योतिषशास्त्रात, शुक्र ग्रह हा संपत्ती, सौंदर्य, प्रेमाचा कारक मानला जातो, तर दुसरीकडे, सूर्य हा यश, आत्मविश्वास, आरोग्य इत्यादींचा कारक मानला जातो. अशा स्थितीत गणेश चतुर्थीला सूर्य आणि शुक्राच्या संयोगामुळे सर्व 12 राशींवर परिणाम होईल, परंतु 4 राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल.

Astrology: बाप्पांच्या आगमनासोबतच होत आहे शुक्राचे गोचर, या चार राशींना होणार विशेष लाभ
शुक्र गोचर
Image Credit source: Social Media
Follow us on

उद्या म्हणजेच 31 ऑगस्टला घराघरात बाप्पांचे आगमन  होणार आहे. गणेच चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi)  दिवशी शुक्रही आपली राशी बदलणार (Venus transit) आहे. 31 ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह आपली राशी बदलून सिंह राशीत प्रवेश करेल. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे आणि तो सिंह राशीमध्ये आधीपासूनच आहे. दुसरीकडे ज्योतिषशास्त्रात, शुक्र ग्रह हा संपत्ती, सौंदर्य, प्रेमाचा कारक मानला जातो, तर दुसरीकडे, सूर्य हा यश, आत्मविश्वास, आरोग्य इत्यादींचा कारक मानला जातो. अशा स्थितीत गणेश चतुर्थीला सूर्य आणि शुक्राच्या संयोगामुळे सर्व 12 राशींवर परिणाम होईल, परंतु 4 राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल.

  1. मेष- शुक्राच्या राशीत बदलामुळे मेष राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळेल. जीवनातील सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. वडिलांकडून आर्थिक सहकार्य मिळेल. जीवनातील अनेक समस्या दूर होतील. व्यवसाय आणि नोकरीत बढतीमुळे उत्पन्नात वाढ होईल. अतिरिक्त उत्पन्नाची गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
  2. वृषभ- वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण खूप खास असणार आहे कारण शुक्र ग्रह देखील वृषभ राशीचा स्वामी आहे. वृषभ राशीच्या लोकांना या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो. लक्ष्मी देवीची अपार कृपा राहील. मान-सन्मान वाढल्याने शुभवार्ताही मिळतील.
  3. सिंह- या राशीचा स्वामीग्रह सूर्य आहे. शुक्राचे संक्रमण फक्त सिंह राशीत होत आहे आणि या कारणास्तव सिंह राशीमध्ये शुक्र आणि सूर्याचा संयोग लाभदायक ठरू शकतो. सिंह राशीच्या लोकांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. करिअरमध्ये प्रगती आनंद देईल. तब्येतही सुधारेल.
  4. कुंभ- कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण खूप फायदेशीर ठरेल. प्रेम, पैसा, आदर सर्वकाही मिळेल. जीवनातील सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. करिअर बदलून आर्थिक लाभ होऊ शकतो. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
  5. हे सुद्धा वाचा

सिंह राशीत शुक्राच्या संक्रमणाची वेळ

सिंह राशीतील शुक्राचे संक्रमण बुधवार, 31 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 04:09 वाजता होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह जल तत्व कर्क राशीपासून सिंह राशीत अग्नि तत्वात प्रवेश करेल. सिंह हा शुक्रासाठी शत्रूसारखा आहे, अशा स्थितीत परिस्थिती फारशी अनुकूल मानली जात नाही, खरे तर शुक्र आणि सिंह राशीमध्ये अनेक साम्य आहेत, त्यामुळे ही परिस्थिती फलदायी ठरू शकते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)