आयुष्यात अनेकदा अचानक संकटं येतात. काही संकटांची तर आपण कल्पना देखील केलेली नसते. बऱ्याचदा सुरळीत चाललेय आयुष्याला कुणाची तरी दृष्ट लागली की, काय अशी शंका येते. आर्थिक संकटं, आरोग्याच्या समस्या, खोटे आळ अशा अनेक समस्या अकारणच माणसाच्या वाट्याला येते. बऱ्याचदा मेहनत करून त्याचे फळं देखील मिळत नाही. यावर जोतिषशास्त्रात काही प्रभावी उपाय सांगण्यात आलेले आहेत. ज्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा (Negative energy) नाश होतो व सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. तुरटीशी (Alum) संबंधित काही उपाय जोतिषशास्त्रात (Astrology) दिल्या गेले आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.
कधीकधी मतभेद काही लोकांच्या आयुष्यात अडचणीचे मोठे कारणबनते. तुमच्याही कुटुंबात कायम वाद होत असतील किंवा मतभेदांमुळे घरातील शांतता भंग होत असेल तर एकदा तुरटीशी संबंधित हा उपाय अवश्य करा. ज्योतिषशास्त्रानुसार घरातील कलह दूर करण्यासाठी घराच्या कोणत्याही कोपऱ्यात काचेच्या भांड्यात तुरटी ठेवा आणि दर मंगळवारी बदलत राहा. या उपायाने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. गृहकलह संपुष्टात येतात.
घरात नकारात्मक ऊर्जा जाणवत असल्यास ती दूर करण्यासाठी तुम्ही दररोज तुरटी पाण्यात मिसळून घर पुसून काढावे. वाईट नजर टाळण्यासाठी किंवा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी, तुरटीचा तुकडा काळ्या कपड्यात बांधून दारात लटकवा. तुरटीचा हा उपाय केल्याने चमत्कारिक बदल होतात असे मानले जाते.
जर तुम्हाला रात्री झोपताना भयानक स्वप्ने येत असतील किंवा तुमच्या घरातील मूल रात्री अचानक जागे होत रडत आले तर यावर देखील तुरटीचा एक उपाय सांगण्यात आलेला आहे. असे मानले जाते की तुरटीचा तुकडा कापडात बांधून पलंगाखाली ठेवल्यास भीतीदायक स्वप्न पडणे थांबतात.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)