Astrology: या राशींसाठी वरदान आहे पुखराज रत्न, सूर्यासारखे चमकते भाग्य

| Updated on: Aug 20, 2022 | 8:26 AM

हे रत्न यश, मनाची इच्छाशक्ती, बलवान आणि संपत्तीने परिपूर्ण होण्यासाठी धारण केले पाहिजे. पुखराज रत्न तात्विक समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते. हे रत्न धारण केल्याने नवीन ऊर्जा निर्माण होते.

Astrology: या राशींसाठी वरदान आहे पुखराज रत्न, सूर्यासारखे चमकते भाग्य
पुखराज रत्न
Image Credit source: Social Media
Follow us on

Astrology: ज्योतिषशास्त्रात रत्नांना विशेष महत्त्व आहे.  ग्रहांसारखाच रत्नांचासुद्धा मनुष्याच्या जीवनावर परिणाम होतो. पुखराजाला (Pukhraj) ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. पुष्कराज रत्नाचे दोन प्रकार (Pukhraj Types) आहेत. एक पिवळा आणि दुसरा पांढरा पुष्कराज आहे. हा रत्न  बृहस्पतिचा कारक आहे. हे रत्न यश, मनाची इच्छाशक्ती, बलवान आणि संपत्तीने परिपूर्ण होण्यासाठी धारण केले पाहिजे. पुखराज रत्न तात्विक समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते. हे रत्न धारण केल्याने नवीन ऊर्जा निर्माण होते.

या राशींसाठी फायदेशीर

मीन आणि धनु राशीच्या लोकांना पुष्कराज जास्त फायदा देतो. त्यामुळे या राशीच्या लोकांनी हे रत्न धारण करावे. पुखराज हे असे रत्न आहे. ज्यामध्ये कार्य निर्माण करण्याची आणि नष्ट करण्याची शक्ती आहे.

 

हे सुद्धा वाचा

पुखराज रत्न धारण करण्याचे फायदे

  1.  पुखराज  धारण केल्याने प्रगतीचे मार्ग प्राप्त होतात. व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. हे रत्न मानसिक शांतीसाठी गुणकारी मानले जाते.
  2.  जर एखाद्या व्यक्तीने  पुखराज रत्न धारण केले तर त्याला चांगल्या-वाईट गोष्टी समजून घेण्याची शक्ती मिळते. रत्नाच्या प्रभावाने कौटुंबिक सुख मिळते.
  3. हे रत्न धारण केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात. कर्जापासून मुक्ती होते.
  4.  पुखराज व्यक्तीला तणावातून मुक्त होण्याची शक्ती देते. आरोग्याच्या समस्या कमी होते. हे रत्न शैक्षणिक क्षेत्रात यशाचा कारक मानले जाते.
  5. पुखराजाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीची विचारशक्ती वाढते. ज्यामुळे व्यक्ती आपल्या जीवनात योग्य निर्णय घेऊ शकते.

 

पुखराज किती कॅरेटचे असावे?

 

ज्योतिषशास्त्रानुसार, एखादी व्यक्ती हे रत्न 5 कॅरेटचे धारण करू शकते. किमान  3 कॅरेटपर्यंत तर ते असावेच त्याशिवाय त्याचा प्रभाव होत नाही.  हे रत्न सोने किंवा चांदीच्या धातूपासून बनवलेल्या अंगठीत धारण करणे फायदेशीर मानले जाते.

 

रत्न धारण करण्याची पद्धत

 

गुरुवारी सूर्योदयानंतर हे रत्न दूध, मध, गंगाजल, साखर इत्यादींच्या मिश्रणात टाकावे. त्यानंतर बृहस्पती देवासमोर उदबत्ती लावून ओम ब्रह्मा ब्रहस्पतीये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्यानंतर भगवान विष्णूच्या चरणी अंगठीला स्पर्श करून ती परिधान करावी. ही अंगठी उजव्या हाताच्या अनामिकेत घालावी.

 

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)