मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब केल्याने व्यक्तीचे भाग्य उजळते. असे म्हणतात की घरात काही वस्तू आणल्याने भाग्योदय होतो. यासाठी जोतिषशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आलेले आहेत. वास्तुशास्त्रानुसार घरातील काही छोट्या गोष्टींची काळजी न घेतल्याने वास्तुदोष निर्माण होतात. घरातील वास्तुदोष व्यक्तीच्या सुख आणि प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात. परंतु यावर काही उपाय केल्यास त्या व्यक्तीला अपेक्षित यश मिळते. यापैकी एक उपाय म्हणजे शंख. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा प्रिय शंख घरात ठेवल्यानेच माणसाच्या कामात येणारे अडथळे दूर होतात.
वैदिक ज्योतिषात शंख अत्यंत पवित्र मानला जातो. कोणत्याही प्रकारची पूजा, पठण, धार्मिक विधी किंवा शुभ कार्य इत्यादींची सुरुवात शंख फुंकूनच केली जाते. यामागे अनेक पौराणिक समजुती सांगितल्या आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार शंखाचे काही उपाय माणसाला धनवान बनवतात. तसेच वास्तुदोषांपासून मुक्ती मिळते.
ज्योतिष शास्त्रानुसार घरातील पूजेच्या ठिकाणी चांगला शंख ठेवा. असे म्हटले जाते की घरात शंख ठेवल्याने माणसाच्या चांगल्या दिवसांची सुरुवात होते. एवढेच नाही तर शंख ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
रोज पूजेनंतर शंख फुंकणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की शंखाचा आवाज वातावरणात जिथे जातो तिथे भूत, पिशाच इत्यादी येत नाहीत. शंखाचा आवाज संपूर्ण घरामध्ये सकारात्मक ऊर्जा भरतो. त्यामुळे सौभाग्य प्राप्त होते.
असे मानले जाते की पूजेपूर्वी शंख पाण्याने भरावा. असे केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि घरात देवी लक्ष्मी वास करते. पूजेनंतर घराच्या कानाकोपऱ्यात शंख पाणी शिंपडावे. हा उपाय केल्याने वास्तुदोष दूर होतात आणि घरात शांती नांदते. एवढेच नाही तर कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्नही वाढते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)