Astrology: या तीन राशींना 2025 पर्यंत राहावे लागेल सावध! शनीची असणार वक्रदृष्टी

| Updated on: Nov 13, 2022 | 1:16 PM

नवीन वर्षात काही राशींना शनीची साडेसाती सुरु होणार आहे त्यामुळे त्यांच्यावर शनिदेवाची वक्रदृष्टी असेल.

Astrology: या तीन राशींना 2025 पर्यंत राहावे लागेल सावध! शनीची असणार वक्रदृष्टी
शनिदेव
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई,  29 एप्रिलपासून शनी (Shani Sadesati) कुंभ आणि नंतर स्वतःच्या राशीत म्हणजेच मकर राशीत जाईल. जिथे तो 29 मार्च 2025 पर्यंत राहणार आहे. 5 जून रोजी शनि प्रतिगामी झाला आहे, जो 23 ऑक्टोबरपर्यंत या प्रतिगामी अवस्थेत होता, आता तो मकर राशीत भ्रमण करीत आहे. शनीच्या या स्थितीमुळे 3 राशीच्या लोकांना 2025 पर्यंत काळजी घ्यावी लागेल. या राशी कोणत्या आहेत जाणून घेऊया.

  1.   कुंभ: 29 एप्रिल 2022 रोजी शनी कुंभ राशीत गेला. त्यानंतर 5 जून रोजी शनि या राशीत मागे पडला. त्यानंतर 12 जुलै रोजी प्रतिगामी शनीने मकर राशीत प्रवेश केला.  आता 17-18 जानेवारी 2023 रोजी शनी कुंभ राशीत प्रवेश करेल, जिथे तो 2025 पर्यंत राहील. 2025 पर्यंत तुमच्या आयुष्यात चढ-उतार दिसतील. यानंतर जीवन सामान्य होईल परंतु 23 फेब्रुवारी 2028 रोजी शनीच्या साडेसातीपासून तुम्हाला आराम मिळेल.
  2.  मकर: मकर राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती आणि साडेसातीचा काळ 26 जानेवारी 2017 पासून सुरू झाला. का काळ  29 मार्च 2025 रोजी संपेल.
  3.  मीन: 29 एप्रिल 2022 रोजी जेव्हा शनीने कुंभ राशीत प्रवेश केला तेव्हा मीन राशीवर शनीची साडेसाती सुरू झाली. 29 मार्च 2025 रोजी जेव्हा शनि कुंभ राशीत जाईल तेव्हा तुम्हाला थोडा आराम मिळेल. तथापि, ही साडेसाती  17 एप्रिल 2030 पर्यंत मीन राशीत राहील. तुमच्यासाठी साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे.

 

साडेसातीचे चरण: साडेसातीचा शेवटचा टप्पा मकर राशीवर, दुसरा टप्पा कुंभ राशीवर आणि पहिला टप्पा मीन राशीवर असेल. ज्यामध्ये कुंभ राशीच्या लोकांसाठी सर्वात त्रासदायक काळ असेल. कारण ज्योतिषशास्त्रानुसार दुसरा टप्पा सर्वात वाईट मानला जातो.  17 जानेवारी 2023 रोजी धनु राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीपासून पूर्ण मुक्ती मिळेल.

शनीची अडीचकी

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)