Astrology : मंगळाचे तुळ राशीत गोचर, या राशीच्या लोकांना होणार मोठा लाभ

| Updated on: Oct 04, 2023 | 5:49 PM

तूळ राशीमध्ये या दोन ग्रहांचा संयोग (Astrology) अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दोन ग्रहांच्या संयोगाचा व्यापक प्रभाव पडेल. काही राशीच्या लोकांवर देखील मंगळ आणि केतूच्या संयोगाचा परिणाम होईल आणि त्यांच्या जीवनात अनेक टर्निंग पॉइंट येतील.

Astrology : मंगळाचे तुळ राशीत गोचर, या राशीच्या लोकांना होणार मोठा लाभ
मंगळ गोचर
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : काल संध्याकाळी मंगळाने तूळ राशीत प्रवेश करणार केला. संध्याकाळी 5.57 वाजता मंगळ तूळ राशीत आलानंतर मंगळ आणि केतू यांचा संयोगही तयार झाला.  16 नोव्हेंबर 2023 पर्यंत मंगळ आणि केतू एकत्र राहतील. मंगळ आणि केतू हे दोन्ही अग्निमय ग्रह आहेत. अशा स्थितीत तूळ राशीमध्ये या दोन ग्रहांचा संयोग (Astrology) अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दोन ग्रहांच्या संयोगाचा व्यापक प्रभाव पडेल. काही राशीच्या लोकांवर देखील मंगळ आणि केतूच्या संयोगाचा परिणाम होईल आणि त्यांच्या जीवनात अनेक टर्निंग पॉइंट येतील. जाणून घेऊया तूळ राशीत मंगळ गोचर झाल्यानंतर पुढील 45 दिवसात मंगळ कोणत्या राशीत असेल. कोणत्या राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात अशुभ दिसेल. तूळ राशीतील मंगळाचे संक्रमण चार राशींसाठी कसे असेल ते सविस्तर जाणून घेऊया.

या राशीच्या लोकांवर होणार प्रभाव

वृषभ

वृषभ राशीच्या नोकरदार लोकांसाठी मंगळाचे हे संक्रमण खूप चांगले असणार आहे. या काळात वृषभ राशीचे नोकरी करणारे लोक नोकरी बदलू शकतात. या काळात तुम्ही तुमच्या विरोधकांवरही वर्चस्व गाजवाल. मात्र, आईच्या बाजूच्या लोकांशी बोलताना सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो.

मिथुन

तूळ राशीतील मंगळाचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप चांगले सिद्ध होईल. या काळात मिथुन राशीचे जे लोक क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणार आहेत त्यांना चांगले परिणाम मिळतील. या काळात तुमचे मनोबल उंच राहील, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकाल.

हे सुद्धा वाचा

कर्क

तूळ राशीतील मंगळाचे संक्रमण धनाच्या बाबतीत कर्क राशीच्या लोकांसाठी खूप छान असणार आहे. कर्क राशीचे काही लोक या काळात जमीन किंवा वाहन खरेदी करू शकतात. या राशीच्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी चांगले बदलही दिसू शकतात. मात्र, या काळात तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

सिंह

तूळ राशीतील मंगळाचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांना आत्मविश्वासाने भरून टाकेल. असे केल्याने तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. या राशीचे लोक या काळात साहसी काम करू शकतात. यासोबतच तुम्ही तुमच्या लहान भाऊ बहिणींसोबत कुठेतरी फिरू शकता.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)