बुध ग्रहाचे गोचर
Image Credit source: Social Media
मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) ग्रहपरिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. जोतिषशास्त्रात राशी परिवर्तनाला गोचर (Gochar) देखील म्हणतात. जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येतो. 26 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह (Mercury Planet Transit) कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. आता 13 नोव्हेंबरपर्यंत बुध या राशीत राहणार आहे. ज्योतिषांच्या मते बुध ग्रहाचे हे संक्रमण पाच राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक, करिअर आणि आरोग्य याबाबतीत शुभ परिणाम मिळतील.
- मेष- तूळ राशीतील बुधाचे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी शुभ राहणार आहे. वेळेवर योग्य निर्णय घेण्याची क्षमता तुम्हाला प्रत्येक प्रसंगी मजबूत करेल. भागीदारीत व्यवसायात अधिक लाभ होईल. लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. पैशाच्या बाबतीतही स्थिती चांगली राहील.
- मिथुन- बुधाचे हे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांचे नशीब नशिबाचे दार उघडणारे ठरेल. करिअरच्या बाबतीत तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळू शकतात. शैक्षणिक क्षेत्रातही तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. या दरम्यान तुम्ही कोणतेही शुभ कार्य सुरू केले तर त्याचे फायदे तुम्हाला दीर्घकाळ मिळतात.
- कर्क- कर्क राशीच्या लोकांसाठी बुधाचा राशीत बदल खूप फायदेशीर ठरणार आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या मार्गाने पैसे मिळू शकतात. अडकलेले पैसेही मिळू शकतात. तुम्हाला वेतनवाढ किंवा पदोन्नती मिळू शकते. मुलांकडून काही चांगली माहिती मिळू शकते.
- सिंह- हे बुधाचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस आणू शकते. कुटुंबात चांगले वातावरण राहील. नात्यात गोडवा येईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पुढील दोन-तीन आठवडे तुमच्यासाठी आर्थिक प्रकरणात खूप चांगले असणार आहेत.
- धनु- बुधाचे हे संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठीही खूप फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला पैसे कमवण्याचे नवीन साधन मिळेल. आर्थिक आघाडीवर सर्वांगीण लाभ होतील. आरोग्य उत्तम राहील. दीर्घकाळापासून घरी आजारी असलेल्या वृद्धांच्या तब्येतीतही सुधारणा दिसून येईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)