ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांना अतिशय महत्त्व आहे. ग्रहांचा प्रभाव सर्वच बारा राशींवर होतो. एखाद्या राशीसाठी ग्रहांचा प्रभाव लाभदायक तर एखाद्यसाठी तो हानिकारक असतो. ज्योतिषशास्त्रानुसार जिथे कुंडलीतील ग्रहांची मजबूत स्थिती माणसाच्या जीवनात यश आणि सुख-समृद्धीचे कारण असते, तिथे ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे असे मानले जाते की, शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळ्या ग्रहांचा प्रभाव असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, वाणीवर गुरु ग्रहाचे राज्य आहे, तर कानांवर शनि आणि मंगळ ग्रहाचे राज्य आहे. अशा स्थितीत संबंधित ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे अवयवांशी संबंधित आजार होण्याची दाट शक्यता असते. चला तर मग जाणून घेऊया कमजोर शुक्रामुळे कोणते रोग होतात आणि त्यासंबंधीचे उपाय.
ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रह कमजोर असेल तर त्याला डायबिटीज, अंगठ्याचा त्रास, त्वचा, डोळे आणि गुप्तांगांशी संबंधित आजार होतात. चला तर मग जाणून घेऊया कुंडलीत कमजोर असलेल्या शुक्राला कसे ठीक करावे.