Astrology : नोकरीत पगारवाढ किंवा प्रमोशन मिळवायचे आहे? मग अवश्य करा हे ज्योतिषीय उपाय

| Updated on: Mar 16, 2023 | 11:41 PM

वर्षभर चांगले काम आणि मेहनत करूनही जर तुम्हाला योग्य पगारवाढ मिळाली नसेल तर नक्कीच तुम्ही नाखुश असाल, कारण आजकाल महागाईच्या जमान्यात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाला आहे.

Astrology : नोकरीत पगारवाढ किंवा प्रमोशन मिळवायचे आहे? मग अवश्य करा हे ज्योतिषीय उपाय
ज्योतीषशास्त्र उपाय
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : अप्रेजलचा हंगाम सुरू आहे आणि प्रत्येकाला चांगले काम करायचे आहे जेणेकरून त्यांना चांगले प्रमोशन मिळेल आणि पगारात वाढ होईल. बहुतेक काम करणार्‍या लोकांची तक्रार असते की पगार त्यांच्या कामाच्या प्रमाणात मिळत नाही आणि बॉसशी संबंधही फारसे चांगले नसतात, ज्याचा  प्रभाव अप्रेजल वर होतो. वर्षभर चांगले काम आणि मेहनत करूनही जर तुम्हाला योग्य पगारवाढ मिळाली नसेल तर नक्कीच तुम्ही नाखुश असाल, कारण आजकाल महागाईच्या जमान्यात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाला आहे. ज्योतिषशास्त्रात (Astro tips For increment) पदोन्नती आणि वेतनवाढीसाठी काही उपाय दिलेले आहेत जे तुम्ही अप्रेजलच्या वेळेस करावे. हे उपाय केल्याने पदोन्नतीतील अडथळे दूर होतील आणि तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला वेतनवाढीच्या रूपात मिळू शकते.

नोकरीत बढती आणि पगारवाढीसाठी उपायांबद्दल जाणून घेऊया

चांगल्या प्रमोशनसाठी सात प्रकारची धान्ये (तीळ, केडव, मूग, धान, जव, गहू आणि हरभरा) पक्ष्यांना रोज खाऊ घाला. या तृणधान्यांमध्ये ज्वारी, मका, तांदूळ इत्यादींचाही समावेश करता येतो पण तुमच्या छतावर धान्याचे दाणे ठेवू नका हे लक्षात ठेवा. यासोबतच दर गुरुवारी गरीब आणि गरजू व्यक्तीला पिवळी फळे किंवा कपडे इत्यादी पिवळ्या वस्तू दान करा. असे केल्याने, बॉसशी चांगले संबंध तयार होतात आणि करिअर वाढीच्या नवीन संधी देखील उपलब्ध होतात.

पदोन्नतीतील अडथळा होईल दूर

चांगल्या वाढीसाठी, चैत्र नवरात्रात एक सुपारी घेऊन त्या पानाच्या दोन्ही बाजूंना मोहरीचे तेल लावावे आणि नंतर ते माँ दुर्गाला अर्पण करावे. यानंतर झोपताना हे पान डोक्याजवळ ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते पान दुर्गा मंदिराच्या मागे ठेवा. असे केल्याने वेतनवाढ आणि पदोन्नतीतील अडथळा दूर होतो आणि आईच्या आशीर्वादाने पगार वाढण्याची शक्यता असते.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)