वर्ष 2024 च्या सुरुवातीला बुध ग्रहामुळे तीन राशींचं होणार भलं, दोन राजयोगामुळे भरभराट

| Updated on: Dec 06, 2023 | 5:54 PM

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचराकडे बारीक लक्ष असतं. कोणता ग्रह कोणत्या राशीत आणि कोणत्या स्थितीत विराजमान आहे. यावरून भाकीत वर्तवलं जातं. असं असताना वर्ष 2024 मध्ये बुध ग्रहाची स्थिती तीन राशींसाठी फलदायी ठरणार आहे. दोन राजयोगामुळे आर्थिक स्थिती सुधारेल, अशी आशा वर्तवली जात आहे.

वर्ष 2024 च्या सुरुवातीला बुध ग्रहामुळे तीन राशींचं होणार भलं, दोन राजयोगामुळे भरभराट
बुध ग्रहाची गोचर स्थिती तीन राशींना फळणार, 2024 च्या सुरुवातीला 'अच्छे दिन'
Follow us on

मुंबई : ग्रह कधीच एका स्थानात कायमस्वरूपी बसत नाही. त्यांची स्थिती ठरावीक कालावधीनंतर बदलत असते. त्यामुळे राशीचक्रावर त्याचा चांगला वाईट परिणाम होत असतो. प्रत्येक ग्रहाचा स्वभाव, जुळणाऱ्या राशी यावरून एक अंदाज बांधला जातो. वर्ष 2024 सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. अशात कोणता ग्रह वर्षाच्या सुरुवातीला फलदायी ठरेल, याबाबत अंदाज बांधला जात आहे. जानेवारीत बुध ग्रह मीन राशीत गोचर करणार आहे. मीन ही बुधाची नीच रास गणली जाते. यामुळे नीचभंग राजयोग आणि महाधन राजयोग तयार होणार आहे. यामुळे 2024 मध्ये काही राशींचं नशीब चमकू शकतं. तीन राशींना या स्थितीचा सर्वाधिक फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात या लकी तीन राशी कोणत्या ते…

या राशींचं होणार भलं

मिथुन : बुधाच्या गोचरामुळे या राशीच्या लोकांना लाभ मिळणार आहे. मिथुन राशीचं स्वामित्व या बुध ग्रहाकडे आहे. त्यात कर्म स्थानात म्हणजेच दशम स्थानात गोचर करणार असल्याने करिअरमध्ये आणि व्यवसायात चांगली प्रगती दिसेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात काही सकारात्मक घडामोडी घडतील. त्यामुळे उत्साह आणि आत्मविश्वास द्विगुणित होईल. गेल्या काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना नोकरीची ऑफर मिळू शकते.

वृषभ : बुध ग्रह या राशीच्या एकादश भावात म्हणजे उत्पन्न स्थानात गोचर करणार आहे. आर्थिक स्थिती एकदम मस्त राहील. गेल्या काही दिवसांपासून आलेल्या आर्थिक अडचणी दूर होतील. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम राहील. शेअर बाजार , लॉटरीच्या माध्यमातून लाभ मिळू शकतो. मुलांच्या अभ्यासात प्रगती दिसेल.

कर्क : बुध ग्रह या राशीच्या नवम स्थानात गोचर करणार आहे. हे स्थान भाग्य स्थान म्हणून गणलं जातं. त्यामुळे या कालावधीत बुधाची उत्तम साथ मिळेल. भौतिक सुखांची अनुभूती मिळेल. कामानिमित्त प्रवासाचा योग जुळून येईल. घरात सकारात्मक वातावरण राहील. तसेच धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळेल.

 (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)