आपलं भविष्य कसं असणार? पुढील काळामध्ये आपल्यासोबत काय-काय घटना घडणार? याबाबत सर्वांनाच उत्सुकता असते, आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी आपण ज्योतिषाकडे जातो. ज्योतिष जी भाकीतं करतो त्यातून आपल्याला आपल्या पुढील आयुष्यात काय होणार आहे, या गोष्टींचा अंदाज येतो. ज्योतिषांकडून वर्तवण्यात येणारी भाकितं किती खरी किती खोटी? हा जरी संशोधनाचा विषय असला तरी देखील आपल्याला त्यातून दिलासा मिळत असतो. दरम्यान जेव्हा -जेव्हा जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्यांची चर्चा होते, त्यामध्ये बाबा वेंगा आणि नास्त्रोदमस यांची नाव सर्वात आधी घेतली जातात. बाबा वेंगा या प्रसिद्ध भविष्यवेत्त्या होत्या. एका वादळात सापडल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावली आणि तेव्हापासून त्यांना ज्ञान प्राप्ती झाली असं बोललं जातं.
बाबा वेंगा यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक भविष्यवाणी केल्या होत्या, त्यातील बऱ्याच खऱ्या ठरल्याचा दावा देखील केला जातो. त्यामध्ये अमेरिकेवर झालेला हल्ला, हिटलरचा मृत्यू, जपानमध्ये आलेली त्सुनामी अशी काही उदाहरण देता येतील. बाबा वेंगा यांनी 2025 बाबत देखील अनेक भाकीत वर्तवली आहेत. 2025 मध्ये युद्ध आणि महापुरांचा फटका जगाला बसू शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. जसं बाबा वेंगा यांनी युद्ध भूकंप आणि महापूर याबाबत भाकीत केलं आहे, तसंच भाकीत बाबा वेंगा यांनी काही राशींबद्दल देखील केलं आहे. 2025 मध्ये काही राशींचं भाग्य उजळणार आहे असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. आता बाबा वेंगा यांचं हे भाकीत खरं होताना दिसत आहे.
कारण 29 मार्च रोजी शनि देव हे राशीपरिवर्तन करणार आहेत. हे राशीपरिवर्तन मिथुन आणि कर्क या राशींच्या पथ्थ्यावर पडणार आहे. एप्रिल महिन्यापासून मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांना मोठा लाभ होणार आहे, त्यातच शनि आणि बुध यांची युती देखील होत आहे. बाबा वेंगा यांनी देखील 2025 हे वर्ष मिथुन आणि कर्क राशींच्या लोकांसाठी फायद्याचं ठरेल असं म्हटलं होतं.
एप्रिल महिन्यापासून मिथून आणि कर्क राशींच्या लोकांचं नशीब चमकणार आहे. अनेक दिवसांपासून अडलेलं एखादं मोठं काम या काळात होऊ शकतं. तसेच नोकरी आणि व्यवसायामध्ये देखील मोठा फायदा होणार आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)