मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.हे राशीभविष्य (Horoscope) वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानां (Challenge)चा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.
ग्रहस्थिती तुम्हाला संधी देणारी आहे. मिळालेल्या संधीचा आदर करा. जर तुम्ही भांडवल गुंतवण्याचा विचार करत असाल तर लगेच करा. काही फायदेशीर योजनांबाबत भाऊ किंवा जवळच्या नातेवाईकांशी चर्चा होईल.आळसामुळे कोणतेही काम पुढे ढकलू नका. कारण यामुळे काही महत्त्वाची कामे थांबू शकतात. बोलण्याचा स्वर मऊ ठेवा. अयोग्य भाषेच्या वापरामुळे काही लोकांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते.कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांचे कामात पूर्ण सहकार्य असेल. तसेच काही काळापासून सुरू असलेल्या चढ-उतारातही स्थैर्य येणार आहे.
लव फोकस – बिझी शेड्युल्ड मधून ही तुम्ही फॅमिलीसाठी वेळ द्यायल. काही वेळ त्यांच्या सोबत मनोरंजनात आणि फिरण्यात जाईल.
खबरदारी – घसा बसण्याची शक्यता. आयुर्वेदिक औषधं घेत राहा.
शुभ रंग – ऑंरेज
भाग्यवान अक्षर – न
अनुकूल क्रमांक – 1
आर्थिक बाबतीत अनपेक्षित लाभामुळे मन प्रसन्न राहील. धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात तुमची रूची वाढेल. ज्यामुळे तुमची विचारसरणी सकारात्मक आणि संतुलित राहील. यावेळी, सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडा, वेळ तुमच्या बाजूने आहे.कधीकधी अहंकार आणि अतिआत्मविश्वासामुळे फसवणूक होऊ शकते. मित्रांसोबत आपला वेळ वाया घालवू नका. तुमची ऊर्जा सकारात्मक पद्धतीने वापरल्याने तुमची अनेक कामे सुरळीतपणे पार पडतील.व्यावसायिक कामांमध्ये फारशी सुधारणा होण्याची शक्यता नाही. पण तरीही सध्याचे काम व्यवस्थित पार पडेल. सार्वजनिक व्यवहाराशी संबंधित कामांमध्ये तुम्हाला फायदा होईल. सरकारी नोकरी कराणाऱ्यांवर या दिवशीही काही कामाचा ताण येऊ शकतो.
लव फोकस – नवरा बायकोमध्ये घराच्या व्यवस्थेमुळे काही खटके उडतील. अविवाहित व्यक्तींना चांगलं स्थळ येईल.
खबरदारी – डोकं दुखी जाणवेल. तणावाच्या वातावरणापासून दूर रहा.
शुभ रंग – हिरवा
भाग्यवान अक्षर – र
अनुकूल क्रमांक – 5
जर तुम्ही कोणत्याही पॉलिसीमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्वरीत निर्णय घ्या, परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे. पण इतरांचा सल्ला घेण्याऐवजी तुमच्या मनाचा आवाज ऐका, तुम्हाला नक्कीच योग्य सल्ला मिळेल. कौटुंबिक व वैयक्तिक प्रलंबित कामे मार्गी लागण्याची पूर्ण आशा आहे.उत्पन्नासोबतच खर्चाचा अतिरेक होईल. बाहेरच्या व्यक्तीला तुमच्या कुटुंबात आणि व्यवसायात ढवळाढवळ करू देऊ नका. कारण त्यामुळे विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात. कर्मचाऱ्यांशी संबंध बिघडू नका.
व्यवसायाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. कोणतेही सरकारी काम रखडले असेल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या, तुमचे काम काही दिवसात पूर्ण होईल. मीडिया आणि क्रिएटिव्ह बिझनेसशी संबंधित लोकही चांगले काम करण्यासाठी पुरस्काराचे दावेदार बनू शकतात.
लव फोकस – प्रेमप्रकरणात अंतर ठेवा. नाहीतर त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या व्यवसायावर पडेल. यावेळी घरातील सदस्यांसोबत संबंध चांगले ठेवणं जास्त गरजेचं आहे.
खबरदारी – तब्येत ठीक राहील. तुमचे विचार पॉझिटिव्ह ठेवा.
शुभ रंग – गुलाबी
भाग्यवान अक्षर – क
अनुकूल क्रमांक – 6
(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा. यातील कोणत्याही गोष्टीचा आम्ही दावा करत नाही.)