मुंबई : राशीचक्रात ग्रहांच्या स्थितीमुळे बऱ्याच घडामोडी घडत असतात. या स्थितीचा पृथ्वी आणि मानवी जीवनावर परिणाम होत असतो. काही ग्रह वेगाने, तर काही ग्रह मंद गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यामुळे एका राशीत कधी कधी एकापेक्षा जास्त ग्रह येतात. तेव्हा शुभ अशुभ युती तयार होते. जर शुभ युती असेल, तर शुभ परिणाम दिसून येतात. तर अशुभ स्थिती असेल तर अशुभ परिणाम भोगावे लागतात. गोचर कुंडली आणि वैयक्तिक कुंडली यामधील ग्रहस्थिती योग्य ठिकाणी असल्यास त्याचा फायदा जातकाला होतो. आता बुध ग्रह 27 फेब्रुवारीला शनिच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीत शनिदेव अडीच वर्षांसाठी ठाण मांडून बसला आहे. त्यात सूर्यदेवांनी मकर राशीतून नुकताच कुंभ राशीत प्रवेश केला आहे.
सूर्य आणि बुध ग्रह एकत्र येणार असल्याने बुधादित्य योग तयार होणार आहे. हा योग शुभ मानला जातो. कुंभ राशीत सूर्य आणि शनि असल्याने पिता पुत्रांची युती अशुभ मानली जाते. कारण या दोघांचं एकमेकांशी पटत नसल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलं. दुसरीकडे बुध ग्रह सर्वांशी जुळून घेतो. त्यामुळे कुंभ शुभ अशुभ योग तयार होणार आहेत.या स्थितीचा तीन राशींना फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत.
मिथुन : या राशीच्या लोकांना बुध ग्रह गोचर फलदायी ठरणार आहे. या राशीचा स्वामी बुध ग्रह असून या राशीच्या नवव्या स्थानात विराजमान होणार आहे. हे स्थान भाग्य आणि विदेशाशी निगडीत आहे. त्यामुळे तुम्हाला या काळात नशिबाची चांगली साथ मिळेल. कामाच्या निमित्ताने बाहेरगावी जाण्याचा योग जुळून येईल. तसेच अडकलेली सर्व कामं पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात लाभ मिळू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांना संधी मिळू शकते.
तूळ : बुध गोचर आणि ग्रहांची स्थिती तूळ राशीच्या पाचव्या स्थानात होत आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचं प्रेम या काळात मिळू शकतं. तसेच संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या शुभ समाचार मिळू शकतो. तसेच जोडीदारासोबतचे संबंध या काळात आणखी दृढ होण्याची शक्यता आहे. तसेच संपत्ती आणि वाहन खरेदीसाठी योग्य वेळ आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होईल.
वृषभ : या राशीच्या दहाव्या म्हणजेच कर्म भावात बुध ग्रह गोचर करणार आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या जातकांना त्याचा निश्चितच फायदा होईल. या काळात तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. तसेच कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. नवा व्यवसाय सुरु करण्यासाठी ही वेळ योग्य आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)