मुंबई : बुध हा ग्रह सूर्याच्या सर्वात जवळ भ्रमण करणारा ग्रह आहे. हा ग्रह कायम गोचर करताना सूर्याच्या आसपास गोचर करत असतो. त्यामुळे बुधाचं अस्ताला आणि उदयाला येण्याचं प्रमाण इतर ग्रहाच्या तुलनेत जास्त आहे. कारण गोचर कालावधीत सूर्याच्या एकदम जवळ आलं की त्या त्या ग्रहाचं तेज निघून जातं. त्यामुळे त्या ग्रहाची फळ देण्याची त्या तुलनेत कमी होते. कन्या ही बुधाची उच्च रास आहे आणि मीन ही बुधाची नीच रास आहे. सध्या बुध ग्रह मीन राशी नीचेत असून मेष राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे दुर्लभ नीचभंग राजयोग तयार झाला आहे.
बुध ग्रह 31 मार्चला मंगळाचं प्रभुत्व असलेल्या मेष राशीत दुपारी 3 वाजून 28 मिनिटांनी प्रवेश करेल. बुध या राशीत 7 जून 2023 पर्यंत राहणार आहे. बुध ग्रह 30 मार्चला उदीत होणार आहे. पण सूर्यापासून थोडं लांब जाण्यास काही अवधी लागेल. त्यामुळे नीचभंग राजयोग स्थिती असणार आहे. या योगाचा सर्व राशींवर प्रभाव दिसून येईल. पण चार राशींचा या योगामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे.
मिथुन – या राशीच्या गोचर कुंडलीतील कर्मभावात नीचभंग राजयोग तयार होत आहे. यामुळे रियल इस्टेट, शेअर ब्रोकर, स्टॉक मार्केट, इंपोर्ट एक्सपोर्ट या व्यवसायाशी निगडीत लोकांना फायदा होणार आहे. या काळात नवे करार निश्चित होऊ शकतात. हात घालाल त्या कामात अपेक्षित यश मिळेल. पण यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागेल.
कन्या – ही रास बुधाची उच्च रास आहे. त्यामुळे नीचभंग राजयोगाचा फायदा या राशीच्या जातकांना होईल. जोडीदाराकडून चांगलं सहकार्य या काळात मिळेल. प्रॉपर्टी खरेदी करण्याचा योग जुळून येईल. तसेच अचानकपणे धनलाभ होऊ शकतो. मीडिया, चित्रपटसृष्टीशी निगडीत लोकांना या काळात चांगली फळं मिळतील.
धनु – या राशीच्या जातकांना दुहेरी योगाचा फायदा होणार आहे.गुरुमुळे या राशीत हंसराजयोग तयार झाला आहे. त्याता बुधामुळे नीचभंग राजयोग तयार झाला आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना अपेक्षित फळ मिळेल. नोकरी व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. तसेच पदोन्नती होण्याची दाट शक्यता आहे.
मीन – या राशीत सध्या गुरु ग्रह स्थित आहे. त्यात नीचभंग राजयोगाचा निश्चितच फायदा होईल. समाजात मान सन्मान वाढेल. राजकारणाशी निगडीत लोकांना मोठं पद मिळू शकतं. जोडीदाराच्या मदतीने धनप्राप्ती होऊ शकते. यश प्राप्तीसाठी प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे.ग्रहांची स्थिती आणि प्रयत्न यामुळे काम पटकन पूर्ण होऊ शकतं.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)