Budh Gochar 2023 : 24 जून रोजी बुध ग्रह करणार मिथुन राशीत प्रवेश, चार राशींना होणार लाभ

| Updated on: Jun 21, 2023 | 7:11 PM

राशीचक्राचं संपूर्ण गणित ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतं. ग्रहांचा गोचर आणि त्यांचा स्वभाव राशीचक्रावर परिणाम करत असतो. राजकुमार बुध ग्रह गोचर करणार असून राशीचक्रावर असा परिणाम होईल.

Budh Gochar 2023 : 24 जून रोजी बुध ग्रह करणार मिथुन राशीत प्रवेश, चार राशींना होणार लाभ
24 जून 2023 रोजी बुध ग्रहाच्या गोचरानंतर राशीचक्राचं गणित बदलणार, चार राशींचं नशीब फळफळणार
Follow us on

मुंबई : ग्रहांच्या गोचराचा राशीचक्रावर परिणाम होतो. त्यामुळे त्या त्या राशीच्या लोकांना त्या प्रमाणे फळं भोगावी लागतो. गोचर कुंडलीचा अंदाज सर्वसमावेशक असल्याने वैयक्तिक कुंडलीही पाहणं महत्त्वाचं ठरतं. ग्रहांमध्ये राजकुमाराचा दर्जा असलेला बुध ग्रह 24 जून 2023 रोजी दुपारी 12.35 मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन राशीत गोचर करताच सूर्यासोबत युती होणार आहे. त्यामुळे बुधादित्य योग निर्माण होणार आहे. 8 जुलै 2023 बुध ग्रह या राशीत असणार आहे. त्यानंतर बुध ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. गोचर आणि शुभ योगामुळे राशीचक्रातील चार राशींना जबरदस्त फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात या चार राशी कोणत्या ते…

चार राशींना होणार जबरदस्त फायदा

मेष : या राशीच्या तिसऱ्या स्थानात बुध असणार आहे. बुध ग्रह या राशीच्या तिसऱ्या आणि सहाव्या स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. मीडिया आणि मार्केटिंग व्यवसायात काम करणाऱ्या जातकांना विशेष फायदा होईल. मित्रांकडे अडकलेले पैसे परत मिळतील. जोडीदार आणि भावा बहिणीसोबत संबंध चांगले राहतील.

वृषभ : या राशीच्या दुसऱ्या स्थानात बुध ग्रह असणार आहे. या राशीच्या दुसऱ्या आणि पाचव्या स्थानाचा स्वामी बुध आहे. त्यामुळे सकारात्मक परिणाम दिसून येतील. आर्थिक गणित व्यवस्थित होईल आणि आत्मविश्वास वाढेल. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होतील. घर, संपत्ती विकत घेण्याचा योग जुळून येईल.

कन्या : या राशीच्या पहिल्या आणि दहाव्या स्थानाचा स्वामी बुध ग्रह आहे. या राशीत गोचर करत बुध ग्रह दहाव्या स्थानात येणार आहे. व्यवसायिक दृष्टीकोनातून ही वेळ चांगली असणार आहे. कामानिमित्त विदेशात जाण्याची संधी मिळू शकते. बुधादित्य राजयोगामुळे धनवृद्धी होऊ शकते. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.

कुंभ : या राशीच्या पंचम आणि अष्टम स्थानाचा स्वामी बुध आहे. गोचर करत बुध ग्रह पंचम स्थानात येणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांच्या ज्ञानात भर पडेल. आत्मविश्वास दुपटीने वाढेल. नोकरी बदलण्याची संधी मिळेल. मनासारखा पगार मिळत असल्याने खूश राहाल. व्यवसायिक दृष्टीकोनातून गोचर चांगलं राहील. नवे आर्थिक स्रोत या काळात खुले होतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)