मुंबई : 27 फेब्रुवारी 2023 रोजी बुध ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. मात्र सूर्य जवळ असल्याने बुधाचं तेज काही काळासाठी कमी होणार आहे. त्यामुळे राशींना अपेक्षित फळ मिळणार नाही. कुंभ राशीत सूर्य आणि शनिदेव आहेत. त्यामुळे सूर्याशी झालेल्या युतीमुळे बुधादित्य योग तयार झाला आहे. तर शनि मुळ त्रिकोण राशीत असल्याने शशयोग तयार झाला आहे. बुध ग्रह हा बुद्धी, एकाग्रता, वाणी आणि सौंदर्याचा कारक ग्रह आहे.बुध ग्रह 28 मार्च 2023 रोजी सकाळी 8 वाजून 3 मिनिटांनी कुंभ राशीत अस्ताला जाणार आहे. त्यामुळे काही कमी अधिक प्रमाणात प्रभाव दिसून येईल. चला जाणून घेऊयात कोणत्या राशीवर काय परिणाम होईल ते…
वृषभ – बुध ग्रह या राशीच्या दहाव्या स्थानात अस्ताला जाणार आहे. त्यामुळे तुमच्या कामात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. मेहनतीचं फळ जरूर मिळेल. या काळात आर्थिक स्थिती नक्कीच सुधारेल.
मिथुन – बुध ग्रह या राशीचा स्वामी आहे. या राशीच्या नवव्या स्थानात बुध ग्रह अस्त होणार आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या लोकांना विदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तसेच व्यवसायात चांगले करार निश्चित होऊ शकतात.
सिंह – बुध ग्रह या राशीच्या सातव्या स्थानात अस्ताला जाणार आहे. त्यामुळे उद्योगात आर्थिक स्थिती वर खाली होत राहील. पण भागीदारीच्या व्यवसायात जोडीदाराची चांगली साथ मिळेल. पण कौटुंबिक जीवनात वातावरण चिंताजनक राहिल. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे.
कन्या – बुध ग्रह या राशीच्या सहाव्या स्थानात अस्ताला जाणार आहेत. या काळात उत्पन्न वाढेल. तसेच मन आध्यात्मिक कार्यात रमेल. नोकरी बदलाची दाट शक्यता आहे. तुमच्या आर्थिक स्थितीत या काळात सुधारणा होईल.
तूळ – या राशीच्या पाचव्या स्थानात बुध अस्त होणार आहे. त्यामुळे आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. कारण या काळात त्यांना एखादा त्रास होऊ शकतो. तुमच्या मेहनतीचं या काळात कौतुक होईल. आर्थिक स्थितीही सुधारेल.
मकर – या राशीच्या दुसऱ्या स्थानात बुध ग्रह अस्ताला जाणार आहे. आर्थिक स्थिती चढ उतार पाहायला मिळेल. मकर राशीसाठी बुधाची स्थिती चांगली ठरेल. पण बोलताना आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा.
कुंभ – या राशीतच बुध ग्रह अस्ताला जाणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच एखाद्या गुंतवणुकीत फटका बसू शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक पावलं उचला.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)