मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा शुभ ग्रह असून गोचरामुळ चांगली फळं मिळतात. आता कुंभ रास बुधाच्या आगमनासाठी सज्ज आहे. कारण 27 फेब्रुवारीला बुध ग्रह मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणआर आहे. 27 फेब्रुवारीला संध्याकाळी 4 वाजून 33 मिनिटांनी हे गोचर होणार आहे.चंद्रानंतर सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह म्हणून बुधाची ओळख आहे. कुंभ राशीत गोचर करताना अस्ताला गेलेला शनि सूर्याजवळ 5 अंशाजवळ आणि सूर्य 14 अंशाजवळ असणार आहे. त्यामुळे 27 तारखेनंतर चार दिवश शनि-बुध युती अगदी खेटून असणार आहे. विशेष म्हणजे सूर्यही या राशीत महिनाभरासाठी ठाण मांडून असून मार्चमध्ये मीन राशीत गोचर करणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध या ग्रहाला युवराज आणि शुभ ग्रहाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे बुध ग्रहाने गोचर केल्यानंतर जीवनात अनेक बदल घडून येतात. बुधाचं शनिच्या कुंभ राशीत गोचर केल्याने शुभ फळ देईल. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना फायदा होईल.
वृषभ : बुध ग्रह या राशीच्या दुसऱ्या आणि पाचव्या स्थानाचा स्वामी आहे. बुध ग्रह या ऱाशीच्या दहाव्या स्थानात गोचर करणार आहे. या गोचरामुळे नोकरी करणाऱ्या जातकांना फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला बुधाचं चांगलं पाठबळ मिळेल. कामाच्या ठिकाणी कौतुक झाल्याने आत्मविश्वास देखील वाढेल.नोकरी करणाऱ्या जातकांप्रमाणे व्यवसायिकांनाही फायदा होईल. या काळात कुटुंबाकडून चांगली साथ मिळेल. ज्या कामात हात घालाल त्यात अनपेक्षितपणे लाभ मिळेल.
सिंह : बुध ग्रह या राशीच्या दुसऱ्या आणि अकराव्या स्थानाचा स्वामी आहे.या राशीच्या सप्तम स्थानात बुध ग्रह गोचर करणार आहे. त्यामुळे जोडीदाराकडून चांगली साथ मिळेल. भागीदारीच्या कामात यश मिळताना दिसेल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची दाट शक्यता आहे.या काळात नवीन लोकांशी ओळख होईल. या ओळखीच्या भविष्यात निश्चितच फायदा होईल.
मकर : बुध ग्रह या राशीच्या सहाव्या आणि नवव्या स्थानाचा स्वामी आहे. या राशीच्या लोकांना साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. या राशीच्या दुसऱ्या स्थानात बुधाचं गोचर होणार आहे. भाग्यस्थान असल्याने नशिबाची जबरदस्त साथ मिळेल. आपल्या वकृत्वाने तुम्ही समोरच्या व्यक्तींना आपलंसं कराल. या काळात दूरचा प्रवास शक्य होणार आहे.न्यायालयीन प्रकरणातही अपेक्षित यश मिळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)