Budh Ast : बुधाच्या स्थितीमुळे महिनाभर या राशींचं टेन्शन वाढणार, का ते समजून घ्या

| Updated on: Feb 01, 2024 | 4:24 PM

बुध या ग्रहाला बुद्धिदाता म्हणून संबोधलं जातं. या ग्रहाची स्थिती राशीचक्रावर बराच परिणाम घडवून आणते. सध्या बुध ग्रह मकर राशीत विराजमान आहे. पण सूर्याच्या अगदी जवळ असल्याने आपलं तेज गमावणार आहे. त्यामुळे तीन राशींच्या जीवनात बरीच उलथापालथ होणार आहे.

Budh Ast : बुधाच्या स्थितीमुळे महिनाभर या राशींचं टेन्शन वाढणार, का ते समजून घ्या
बुध ग्रहाची स्थिती या राशींसाठी महिनाभर ठरणार त्रासदायक, कसं आणि का ते जाणून घ्या
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या घडामोडींचा थेट परिणाम मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर होत असतो. त्यात ग्रह गोचर कालावाधीत मित्र किंवा शत्रू ग्रहांसोबत एकत्र येतात. त्याचा परिणाम राशीचक्रावर होत असतो. याचबरोबर ग्रहांचं उदय आणि अस्ताला जाण्याचं प्रमाणही असतं. ग्रह सूर्याच्या अगदी जवळ आला की झाकाळून जातो. या स्थितीला ग्रह अस्ताला जाणं असं संबोधलं जातं. बुध हा सूर्याच्या अगदी जवळ असलेला ग्रह आहे. त्याचबरोबर सूर्याच्या आसपास गोचर करत असतो. त्यामुळे उदय-अस्ताला जाण्याचं प्रमाण अधिक आहे. सध्या बुध ग्रह मकर राशीत असून सूर्यही याच राशीत आहे. त्यामुळे 7 फेब्रुवारीला बुध ग्रह अस्ताला जाणार आहे. सकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी अस्ताच्या दिशेने प्रवास सुरु होईल. त्यानंतर 11 मार्चला संध्याकाली 7 वाजून 17 मिनिटांनी उदय होईल. त्यामुळे महिनाभराचा कालावधी काही राशींसाठी त्रासदायक ठरणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना फटका बसणार ते..

मेष : या राशीच्या जातकांनी महिनाभर तरी सांभाळून राहणं गरजेचं आहे. कारण बुधाचं तेजच नसल्याने काही कामात अडचणी येऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणि अपमानाला सामोरं जावं लागू शकतं. तसेच पगारवाढीसाठी काही काळ आणखी वाट पाहावी लागू शकते. एखाद्या कामात मन रमणार नाही. तसेच काही चुका अंगाशी येऊ शकतात. आर्थिक स्थिती चांगली असली तरी वारेमाप खर्च या कालावधीत होईल. शेवटी हाती काहीच नाही अशी स्थिती निर्माण होईल.

मिथुन : या राशीच्या अष्टम स्थानात बुध अस्ताला जाणार आहे. त्यामुळे दु:खाचा डोंगर या कालावधीत कोसळेल. घरात काही ना काही कारणावरून वाद होत राहतील. त्यामुळे कामाच्या ठिकाणी ताण आणि घरी वेदनादायी वातावरण असं जीवन जगावं लागेल. प्रतिस्पर्धी कंपन्या तुमच्यावर मात करू शकतील. त्यामुळे महिनाभराचा कालावधी त्रासदायक ठरणार आहे.

सिंह : या राशीच्या पंचम स्थानात बुध अस्ताला जाईल. त्यामुळे या काळात डोळ्यात अंजन घालून कामं करावी लागतील. कारण एखादी चूक खूपच महागात पडू शकते. वाहन चालवताना काळजी घ्या. या कालावधीत लांबचा प्रवास करणं टाळा. अपघात होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सावध राहणं गरजेचं आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)