Astrology 2024 : 30 नोव्हेंबरपासून तूळ राशीसह या दोन राशींसाठी अनुकूल काळ, ग्रहांची अशी असेल स्थिती

| Updated on: Nov 26, 2024 | 6:43 PM

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची स्थिती ठराविक कालावधीनंतर बदलत असते. त्याचा परिणाम राशीचक्रावर होत असतो. नोव्हेंबच्या शेवटी अशीच काहीसा बदल होणार आहे. बुध ग्रह वृश्चिक राशीत अस्ताला जाणार आहे.

Astrology 2024 : 30 नोव्हेंबरपासून तूळ राशीसह या दोन राशींसाठी अनुकूल काळ, ग्रहांची अशी असेल स्थिती
Follow us on

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहमंडळात ग्रहांची स्थिती ठराविक कालवधीनंतर बदलते. त्यामुळे शुभ अशुभ योगांची स्थिती निर्माण होते. काही ग्रहांचं एकमेकांशी पटतं तर काही ग्रहांचं पटत नाही. अशा स्थितीचा राशीचक्रावर परिणाम होतो. काही ग्रह सूर्याच्या अगदी जवळ आले की अस्ताला जातात. म्हणजे त्या ग्रहांचा प्रभाव काही काळासाठी कमी होतो. असंच काहीसं 30 नोव्हेंबरला होणार आहे. बुध ग्रह गोचर करताना सूर्याच्या अगदी जवळ जाणार आहे. खरं तर बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. त्यामुळे अस्ताला जाण्याचं प्रमाण अधिक असतं. 30 नोव्हेंबर सूर्याच्या प्रभावामुळे बुध ग्रहाचं तेज कमी होणार आहे. अर्थात बुध ग्रह अस्ताला जाणार आहे. त्यामुळे 12 राशींवर शुभ अशुभ परिणाम होणार आहे. खासकरून तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.

या तीन राशींना लाभ मिळणार

तूळ : बुध ग्रहाचं अस्ताला जाणं या राशीच्या जातकांसाठी चांगले संकेत आहेत. या दरम्यान आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामंही पूर्ण होतील. उद्योगधंद्यात अपेक्षित यश मिळेल. शुक्राशी निगडीत कामात चांगलं यश मिळेल. कमी मेहनतीत अधिकचं फळ मिळेल.

मकर : या राशीच्या जातकांना बुध ग्रहाची स्थिती लाभदायक ठरणार आहे. बुध ग्रह या राशीच्या उत्पन्न स्थानात विराजमान असणार आहे. त्यामुळे तुम्हाला चांगलं यश मिळेल. कमी मेहनतीत अपेक्षित कामं होतील. तुमच्यातील नेतृत्व गुण पाहून तुम्हाला लाभ मिळेल. गुंतवणुकीबाबत विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी चांगलं आहे.

कुंभ : या राशीला बुधाची स्थिती खूप आर्थिक फायद्याची ठरेल. करिअरमध्ये उंची गाठण्यास मदत होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या शब्दाला मान मिळेल. तसेच कामाचा पसारा झटपट आटपेल. वडिलोपार्जित संपत्तीतून चांगला परतावा मिळेल. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करावी.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)