मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह एका कालावधीनंतर राशी बदलतात, ज्यामुळे विविध प्रकारचे योग तयार होतात. 15 मे रोजी म्हणजेच उद्या सूर्य देव वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. दुसरीकडे, राजकुमार बुध 7 जून रोजी या राशीत प्रवेश करेल. दोन्ही ग्रहांच्या राशी बदलामुळे सूर्य आणि बुध यांचा संयोग तयार होत आहे. सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योग (Budhaditya Yoga) तयार होणार असल्याचे ज्योतिषी सांगत आहेत. ज्योतिष शास्त्रामध्ये बुधादित्य योग अत्यंत फायदेशीर मानला गेला आहे. चला जाणून घेऊया बुधादित्य योगामुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल.
बुधादित्य योग निर्माण झाल्यामुळे कन्या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळू शकतात. तसेच, व्यवसाय क्षेत्रात नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. जर एखाद्या व्यक्तीला व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ त्याच्यासाठी शुभ मानला जातो. या दरम्यान आर्थिक प्रगतीची चिन्हे आहेत.
सूर्य आणि बुध यांच्या संयोगाचा शुभ प्रभाव कुंभ राशीवर दिसतो. या काळात जंगम किंवा स्थायी मालमत्तेची खरेदी शुभ ठरू शकते. तसेच कामाचा ताण असला तरी सर्व कामे यशस्वी होतील. वैवाहिक जीवनातही आनंद राहील आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.
बुधादित्य योग निर्माण झाल्यामुळे मीन राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत खुले होतील. यासोबतच आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होत आहे. क्षेत्रात प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात यश मिळेल. व्यापार क्षेत्रातही लाभ होण्याची चिन्हे आहेत. सर्जनशील कार्यात वाढ होऊ शकते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)