मुंबई : 4 एप्रिल रोजी सूर्य मेष राशीत प्रवेश करणार आहे. याला मेष संक्रांत म्हणतात. जर या राशीत बुध आधीपासून असेल तर दोन्हीच्या संयोगाने बुधादित्य योग (Budhaditya yoga) तयार होईल. त्यामुळे लोकांच्या आयुष्यात अनेक मोठे बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम लग्न आणि करिअरसारख्या बाबींवर होणार आहे. या राशी परिवर्तनाचा प्रभाव जवळपास महिनाभर राहील. बुध आणि सूर्याच्या या संयोगामुळे कोणत्या राशींवर जास्त परिणाम होईल ते जाणून घेऊया.
ज्योतिषांच्या मते 14 एप्रिलला सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योग तयार होत आहे. सूर्य आणि राहूचा संयोग देखील असेल, ज्यामुळे ग्रहण योग तयार होईल. यासोबतच सूर्य आणि बुध यांच्या संयोगाचा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडेल. पण 3 राशी आहेत, ज्यांना या राशीत नशिबाची पूर्ण साथ मिळेल. चला जाणून घेऊया बुधादित्य योगामुळे कोणत्या राशींना फायदा होतो.
सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने मालमत्तेशी संबंधित समस्या दूर होतील. मेष राशीच्या लोकांसाठी बुध-सूर्यचा योग अनुकूल ठरू शकतो. उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे. पैशाशी संबंधित समस्या कमी होण्याची शक्यता आहे. तुमच्या छंदाचे व्यवसायात रुपांतर करण्याची हीच योग्य वेळ आहे. यावेळी डोकेदुखी आणि डोळ्यांच्या समस्या जाणवू शकतात.
करिअर आणि संपत्तीच्या बाबतीत सूर्य-बुधाचा योग मेष राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. इच्छित जागा बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. तुम्ही तुमचे प्रतिस्पर्धी आणि शत्रूंवर वर्चस्व गाजवाल. एखाद्याशी बराच काळ वाद सुरू असेल तर तो मिटवला जाऊ शकतो आणि प्रकरण तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे.
सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये नवीन संधी आणि यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन गोष्टी शिकण्याची आणि प्रवासाला जाण्याची संधी मिळेल. सूर्याचे हे संक्रमण तुमच्यासाठी भाग्याचे ठरेल. ऑफिसमध्ये पदोन्नती आणि उत्पन्नात वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. मित्र आणि नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)