Astrology 2023 : गुरु राहु युतीमुळे चांडाळ योग, 30 ऑक्टोबरपर्यंतचा काळ मोठ्या उलथापालथीचा

| Updated on: Apr 10, 2023 | 12:23 PM

ज्योतिषशास्त्रात गुरु आणि राहुची युती सर्वात अशुभ युती गणली जाते. या युतीला चांडाळ योग असं म्हंटलं जातं. ज्या जातकांच्या कुंडलीत या योग असतो त्यांना प्रचंड त्रास होतो.

Astrology 2023 : गुरु राहु युतीमुळे चांडाळ योग, 30 ऑक्टोबरपर्यंतचा काळ मोठ्या उलथापालथीचा
22 एप्रिलपासून सुरु होणारा चांडाळ योग देशासाठी त्रासदायक! जागतिक स्तरावर मोठ्या घटना घडण्याची शक्यता
Follow us on

मुंबई – ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहांचं स्वत:चं असं अस्तित्व आहे. ग्रह ज्या स्थानात बसला आहे त्यानुसार फळं देतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं जीवन हे सारखं नसतं असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं गेलं आहे. सेकंदापेक्षा कमी वेळात प्रत्येक ग्रह आपली जागा बदलत असतो. त्यामुळे ग्रहांची शुभ अशुभ युती, अंशात्मक कोन, एका स्थानावरून दुसऱ्या स्थानाकडे बघण्याचा दृष्टीकोन, ग्रहांची दृष्टी यासारख्या अनेक बाबी कारणीभूत ठरतात. 22 एप्रिल रोजी गुरु ग्रह मेष राशीत वर्षभरासाठी प्रवेश करणार आहे. या राशीत राहु 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत आहे. या युतीमुळे चांडाळ योग तयार होणार आहे.

देवगुरु बृहस्पती अस्त अवस्थेत मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष ही अग्नितत्व असलेली रास आहे. या राशीत राहु आणि सूर्याच्या युतीमुळे महिनाभरासाठी ग्रहण योगही तयार होणार आहे. त्यामुळे संपूर्ण एक महिना गुरु चांडाळ आणि ग्रहण योगामुळे महिना खूपच किचकट जाईल. 14 मे रोजी सूर्य मार्गस्थ झाल्याने ग्रहण योग संपेल. पण गुरु चांडाळ योग 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत राहणार आहे. त्यानंतर राहु ग्रह मीन राशीत प्रवेश करेल. तर केतु ग्रह कन्या राशीत प्रवेश करेल.

शनिदेव स्वरास असलेल्या कुंभ राशीत बसले आहेत. त्यामुळे त्याची नीचेची दृष्टी मेष राशीवर असेल. त्यामुळे याचा दुष्प्रभाव पाहायला मिळेल. त्यामुळे त्याचे विपरीत परिणाम जगावर दिसून येतील. त्यामुळे जागतिक पातळीवर विदेश निती प्रभावित होईल. साथीचे आजार, आग, भूकंप या सारख्या घटना घडतील, असं ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहमान सांगते.

देशाची कुंडली वृषभ लग्न राशीची आहे. त्यामुळे गुरु चांडाळ योग द्वादश भावात तयार होणार आहे. त्यामुळे परराष्ट्र धोरणांवर परिणाम दिसून येईल. त्यामुळे परराष्ट्रनिती चोखंदळपणे हाताळावी लागणार आहे. 30 ऑक्टोबर 2023 रोजी राहु आणि केतुने गोचर केल्यानंतर मेष, वृषभ, कन्या आणि मीन राशीला अडचणीचा कालावधी ठरेल

सूर्य हा ग्रहांचा म्हणजेच सत्ताधारी आहे. तर गुरु हा ग्रह सिंहासनाचा कारक ग्रह आहे. त्यामुळे दोन्ही ग्रह राहुसोबत असल्याने सत्ता आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतील. त्यात 10 मे रोजी मंगळ आपल्या नीत राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे शनिपासून षडाष्टक योग तयार होणार आहे. त्यामुळे एखादी मोठी वाईट घटना घडू शकते. त्यामुळे सतर्क राहणं गरजेचं आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)