Grahan Yog 2024 : वर्षाच्या सुरुवातीला चंद्र आणि केतुची अभद्र युती, सव्वा दोन दिवस या राशींना त्रासदायक

| Updated on: Jan 01, 2024 | 5:25 PM

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक एका ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतो. चंद्राचा राशी बदलाचा वेग इतर ग्रहांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे शुभ अशुभ योगांची स्थिती अनुभवता येते. चंद्र या वर्षाच्या सुरुवातीला कन्या राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे सव्वा दोन दिवस तीन राशीच्या जातकांना फटका बसू शकतो.

Grahan Yog 2024 : वर्षाच्या सुरुवातीला चंद्र आणि केतुची अभद्र युती, सव्वा दोन दिवस या राशींना त्रासदायक
चंद्र आणि केतुच्या युतीमुळे सव्वा दोन दिवस ग्रहण योग, चंद्र बळ कमी झाल्याने या राशींना होणार त्रास
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी हा ठरलेला आहे. ग्रहाने राशी बदल करताच त्याचा परिणाम राशीचक्रावर होतो. कारण त्या ग्रहांचं स्थान बदलतं आणि 12 व्या स्थानात कोणत्या स्थानात या ग्रहाने गोचर केलं आहे ते पाहिलं जातं. ग्रह आपल्या स्वभावानुसार फळं देत असतो. चंद्र जानेवारी महिन्यात 13 वेळा राशी बदल करणार आहे. त्यामुळे जवळपास सर्व ग्रहांच्या सान्निध्यात येणार आहे. त्यामुळे राशीचक्रावर त्या त्या ग्रहाच्या युतीनुसार प्रभाव दिसणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 2 जानेवारीला चंद्र आणि केतुची युती होत आहे. या युतीमुळे ग्रह योग लागू होणार आहे. त्यामुळे तीन राशीच्या जातकांनी सव्वा दोन दिवस जरा जपूनच राहावं असं ज्योतिषशास्त्र सांगतं. या कालावधीत सर्वाधिक काळजी घेणं गरजेचं आहे. 2 जानेवारीला चंद्र सिंह राशीतून कन्या राशीत येताच केतुशी युती होईल आणि ग्रहण योग लागेल. हा योग सव्वा दोन दिवस असेल. त्यानंतर 5 जानेवारीला चंद्र कन्या राशीतून तूळ राशीत जाईल आणि ग्रहण सुटेल.

या तीन राशींनी जरा जपून

मेष : मेष राशीच्या जातकांना ग्रहण योग त्रासदायक ठरू शकते. कारण चंद्र आणि केतुची या राशीच्या सहाव्या स्थानात तयार होत आहे. त्यामुळे या सव्वा दोन दिवसात तब्येतची कारणं पुढे येतील. आळशीपणा जाणवेल.आरोग्याच्या तक्रारी डोकं वर काढतील. मानसिक त्रासाला सामोरं जावं लागून शकतो. कोणताही निर्णय घाई गडबडीत घेऊ नका. काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे तुमचं बजेट बिघडेल.

तूळ : ग्रहण दोष या राशीच्या जातकांना प्रतिकूल परिणाम देईल. कारण चंद्र आणि केतुची युती गोचर कुंडलीच्या 12 व्या स्थानात तयार होत आहे. काही कारणास्तव लांबचा प्रवास करावा लागू शकतो. मनात बरीच उलथापालथ होईल. शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठं नुकसान होऊ शकतं. भावकीच्या वाद उफाळून येईल.

कुंभ : शनि आधीच ठाण मांडून बसला आहे. त्यात चंद्र आणि केतुची युती अष्टम स्थानात होत आहे. त्यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास वाढू शकतो. तसेच प्रवासात काळजी घेणं गरजेचं आहे. धुळीमुळे एलर्जी होऊ शकते. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. या कालावधीत उधारी देणं टाळलं तर बरं होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)