मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा वेगाने गोचर करणारा ग्रह आहे. त्यामुळे त्याचं फळ अल्प कालासाठी असतं. मात्र असलं तरी प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. कारण या काळात कधी काय घडेल सांगता येत नाही. चंद्राचा गोचर आणि कला यावर मनाची स्थिती अवलंबून असते. होळी पौर्णिमेनंतर आता कृष्ण पक्ष सुरु झाला असून फाल्गुन महिन्यातील तृतीया असल्याने चंद्राला उतरती कला सुरु झाली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जातकांना या काळात मनाची चलबिचल झाल्याचं अनुभव येईल. चंद्र ग्रह पहिल्या, तिसऱ्या, सहाव्या आणि दहाव्या स्थानात गोचर करत चांगली फळं देतो. तर इतर स्थानात चंद्र गोचर अडचणीचा ठरू शकतो.
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र 8 मार्च (बुधवार) 2023 रोजी सिंह राशीतून कन्या राशीत सकाळी 8:53 मिनिटांनी प्रवेश करेल.
10 मार्चपर्यंत कन्या राशीत संध्याकाळी 6:37 मिनिटांपर्यंत असेल. कन्या राशीत कोणताही ग्रह नसल्याने ग्रहासोबत युती आघाडीचा प्रश्न येत नाही. त्यामुळे चंद्र हा स्वत:ची फळ देईल.
चंद्रानं पहिल्या स्थानात गोचर केल्यास जातकाला चांगली बातमी मिळते. सव्वा दोन दिवसात चांगली फळं मिळतात. करिअरच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरतो. मेहनतीला अपेक्षित फळ मिळतं.
चंद्राचं तिसऱ्या स्थानातील गोचर यश मिळवून देण्यास अनुकूल असतो.तुमचा मानसन्मान या काळात वाढू शकतो. तसेच आर्थिक स्थितीतही सुधारणा दिसून येते.
चंद्राचं सहाव्या स्थानातील गोचरामुळे तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारची उर्जा जाणवेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या उर्जेचा पुरेपूर वापर कराला. तुमच्या जोडीदार आणि कुटुंबासोबत तुमचे संबंध चांगले राहतील.तुमचा मित्रपरिवार या काळात वाढेल.
चंद्राचं दहाव्या स्थानात गोचर होताच चांगलं फळ मिळेल. व्यवसायातही या काळात फायदा होईल. तुमचे सहकारी तुमच्या कामावर खूश राहतील. त्यामुळे काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. वैवाहिक जीवन आनंददायी राहिल. या काळात नवीन लोकांशी भेटीगाठी होतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)