Grah Gochar : रेवती नक्षत्रात गुरु आणि बुधाची युती, मार्च महिन्याच्या शेवटी या राशींना अच्छे दिन
मुंबई : ज्योतिषशास्त्रात शुभ ग्रह आणि पाप ग्रह अशी वर्गवारी करण्यात आली आहे. गुरु आणि बुध ग्रह यांची वर्णी शुभ ग्रहात येते. त्यामुळे या दोन ग्रहांची शुभ मानली जाते.ग्रह राशीसोबत नक्षत्रात गोचर करत असतात. गुरु ग्रहाने रेवती नक्षत्रात गोचर केलं आहे. या नक्षत्रावर बुध ग्रहाचं अधिपत्या मानलं जातं. आता दोन्ही ग्रहांची रेवती नक्षत्रात युती होणार आहे. बुध ग्रह या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे ज्ञानकारक गुरु आणि बुद्धीदाता बुध ग्रह एकत्र येणार आहेत. त्यामुळे काही जातकांना शुभ फळं मिळणार आहेत. चला जाणून घेऊयात या राशी कोणत्या आहेत.
या पाच राशींना होणार फायदा
- मेष – या राशीच्या जातकांना रेवती नक्षत्रातील गुरु-बुध युती फलदायी ठरणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होऊ शकतो. नवनवे आर्थिक स्त्रोत खुले होतील. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.
- मिथुन – गुरु आणि बुध युतीमुळे या राशीच्या जातकांना करिअरमध्ये चांगली संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी कामाचं कौतुक होईल आणि पदोन्नती मिळू शकते. वाहन, जमीन खरेदीचा योग जुळून येईल.
- वृश्चिक – बुध आणि गुरुच्या युतीमुळे या राशीच्या जातकांना फायदा होईल. आर्थिक स्थिती या काळात सुधारेल. उत्पन्नात वाढ झाल्याने कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. कामाच्या ठिकाणी बॉसकडून कौतुकाची थाप पडेल.
- धनु – या राशीच्या जातकांना नोकरीची नवी संधी चालून येईल. नोकरी बदलण्यासाठी हा काळ उत्तम राहील. करिअरमध्ये नवी उंची गाठण्यासाठी बळ मिळेल. जमीन किंवा वाहन खरेदीसाठी उत्तम काळ आहे.
- कुंभ –या राशीच्या जातकांनाही बुध गुरु चांगली फळं देतील. पण शिक्षणक्षेत्रात असलेल्या जातकांना सर्वाधिक फायदा होईल. कारण या काळात वाणी जबरदस्त होईल. त्याचबरोबर व्यवसायिकांना फायदा होईल.
नक्षत्र
1.आश्विन, 2.भरणी, 3.कृतिका, 4.रोहिणी, 5.मृगशिरा, 6.आर्द्रा 7.पुनर्वसु, 8.पुष्य, 9.आश्लेषा, 10.मघा, 11.पूर्वा फाल्गुनी, 12.उत्तरा फाल्गुनी, 13.हस्त, 14.चित्रा, 15.स्वाति, 16.विशाखा, 17.अनुराधा, 18.ज्येष्ठा, 19.मूल, 20.पूर्वाषाढा, 21.उत्तराषाढा, 22.श्रवण, 23.धनिष्ठा, 24.शतभिषा, 25.पूर्वा भाद्रपद, 26.उत्तरा भाद्रपद आणि 27.रेवती
नक्षत्र स्वामी
- केतु:- आश्विन, मघा, मूल
- शुक्र:- भरणी, पूर्वा फाल्गुनी, पूर्वाषाढा
- रवि:- कार्तिक, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा
- चन्द्र:- रोहिणी, हस्त, श्रवण
- मंगल:- मृगशिरा, चित्रा, धनिष्ठा
- राहु:- आर्द्रा, स्वाति, शतभिषा
- बृहस्पति:- पुनर्वसु, विशाखा, पूर्वा भाद्रपद
- शनि:- पुष्य, अनुराधा, उत्तरा भाद्रपद
- बुध:- आश्लेषा, ज्येष्ठा, रेवती
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)