मुंबई, वास्तुशास्त्रात (Vastu Tips) अशा अनेक गोष्टींचे वर्णन करण्यात आले आहे, जे केल्याने घरात सुख, शांती आणि ऐश्वर्य वाढते. झाडे आणि वनस्पतींबद्दल बोलायचे झाले तर वास्तुशास्त्रात तुळशी, शमी आणि मनी प्लांट अतिशय शुभ मानले गेले आहेत. पण आज आम्ही तुम्हाला एका चमत्कारी वनस्पतीबद्दल (Crassula Plant) सांगत आहोत, जी यापेक्षाही जास्त फायदेशीर आहे. असे मानले जाते की ती लावल्याने संपत्ती आपोआप खेचली जाते आणि कुटुंबाचे भाग्य उजळते.
या आश्चर्यकारक वनस्पतीचे नाव क्रॅसुला आहे. असे म्हणतात की हे रोप घरात लावताच पैसा आणि सकारात्मक ऊर्जा आपोआप घराकडे खेचू लागते. तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे रोप घरात किंवा दुकानात कुठेही लावू शकता. वास्तुशास्त्रानुसार क्रॅसुला रोप लावताना काही नियमांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्या नियमांचे पालन केल्याने या वनस्पतीचा पुरेपूर फायदा होतो. या वनस्पतीच्या नियमांबद्दल जाणून घेऊया.
तुम्ही घरामध्ये किंवा घराबाहेर कुठेही क्रॅसुला रोप लावू शकता. घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला हे रोप लावणे शुभ मानले जाते. हे रोप तुम्ही घराच्या बाल्कनीतही लावू शकता. योग्य दिशेने रोप लावल्यास भाग्य उजळते आणि शुभ परिणाम प्राप्त होतात. हे रोप दक्षिण दिशेला लावू नये. असे केल्याने शुभ परिणाम मिळत नाही.
या वनस्पतीला मनी ट्री, लकी ट्री किंवा जेड असेही म्हणतात. असे म्हणतात की हे रोप घरात किंवा दुकानात लावल्यास आर्थिक स्थिती बळकट होते. ही वनस्पती संपत्ती आकर्षित करते अशी मान्यता आहे.