मेष- आजच्या दिवशी व्यवसायात गुंतवणूक केल्यास फायदा होईल. तुम्ही कोणत्याही नात्यामध्ये आज सावध रहा. शक्यतो कोणाशीही भांडू नका. वृषभ- या राशीच्या व्यक्तींनी व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करा. याशिवाय आजच्या दिवशी नवीन कामातून फायदा होईल. मिथुन- आजच्या दिवशी तुम्हाला ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळणार आहे. तसंच कुटुंबात आनंद राहील. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. कर्क- या राशीच्या व्यक्तींच्या आज नोकरी व्यवसायातील समस्या संपतील. मात्र आजच्या दिवशी वादात पडू नका. घरोघरी मांगलिक सण होईल. सिंह- आजच्या दिवशी तुमचं रागामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचं वाहन कोणालाही देऊ नका. याशिवाय रात्री उशिरापर्यंत जागू नका. कन्या- आजच्या दिवशी तुमचं रहस्य कोणालाही सांगू नका. तुम्हाला बहिणीकडून भेटवस्तू मिळतील. नातेसंबंधांचा आदर करा. तूळ- आजचा दिवस चांगला असून नवीन घर घेण्याचा योग आहे. विविध कारणांमुळे कुटुंबात आनंद राहील. वृश्चिक- आजच्या दिवशी विदेश प्रवासाचा योग राहील. याशिवाय तुम्हाला नोकरीत यश मिळेल. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. धनु- आजच्या दिवशी मनाची चिंता संपणार आहे. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतात. तसंच खर्च वाढण्याची अधिक शक्यता आहे. मकर- आजच्या दिवशी घरातील कलह मिटण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कुटुंबातील लोकांचा सल्ला घ्या. पत्नीचा आदर करा. कुंभ- आजच्या दिवशी तुम्ही लोकांना उधार दिलेले पैसे परत मिळतील. व्यावसायिक समस्या कमी होतील. मीन- आजच्या दिवशी वाहन खरेदीचे योग आहेत. त्याचप्रमाणे नातेसंबंधात गोडवा येईल. (वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)