मुंबई : ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. गुरु जर कुंडलीत बलवान असेल तर किचकट कामंही सहज सोप्या होतात. त्यामुळे गुरु ग्रह कोणत्या स्थानात बसला याचा अभ्यास केला जातो. गोचर कुंडलीनुसार गुरु ग्रह एका राशीत 13 महिने असतो. या स्थितीत वक्री, मार्गस्थ, अस्ताला जाण्याच्या घडामोडी घडतात. त्याचा थेट परिणाम राशीचक्रावर होत असतो. सध्या गुरु ग्रह मेष राशीत ठाण मांडून आहे. महिनाभरापूर्वीत राहुच्या तावडीतून सुटका झाली आहे. आता गुरु ग्रहाला स्वत:चं असं बळ प्राप्त झालं आहे. पण यात आणखी एक भर पडणार ती म्हणजे 31 डिसेंबरला गुरु ग्रह मार्गस्थ होणार आहे. मेष राशीतील या घडामोडींमुळे काही राशींचा लाभ, तर राशींना सांभाळून राहावं लागणार आहे. चला जाणून घेऊयात नवीन वर्ष 2024 साली कोणत्या राशींना लाभ मिळणार ते…
कर्क : या राशीच्या दहाव्या स्थानात सध्या गुरु ग्रह असून वक्री आहे. गुरु मार्गस्थ होतात या राशीच्या जातकांना संमिश्र परिणाम मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम दिसून येतील. पण नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर जरा थांबावं लागेल. गुरु ग्रह वृषभ राशीत गोचर करताच चांगली संधी मिळेल. कौटुंबिक स्तरावर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वडिलांसोबत काही कारणावरून वाद होऊ शकतात. या काळात डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
सिंह : गुरु ग्रह या राशीच्या नवव्या स्थानात गोचर करत आहे. हे लाभस्थान आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून असलेल्या अडचणीतून सुटका होईल. या कालावधीत विदेश दौरा करण्याचा योग जुळून येईल. आध्यात्मात प्रगती दिसून येईल. कुटुंबासोबत देव दर्शनाला जाता येईल. आरोग्य विषयक तक्रारीही दूर होतील. आत्मविश्वास वाढल्याने प्रत्येक क्षेत्रात प्रगती दिसून येईल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणात प्रगती दिसून येईल.
कन्या : गुरु ग्रह या राशीच्या अष्टम स्थानात गोचर करत आहे. गुरु ग्रह अष्टम स्थानात तशी चांगली फळं देत नाही. त्यामुळे जातकांना वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आईवडिलांकडून हवी तशी साथ मिळणार नाही. त्यामुळे या कालावधीत पुरते हैराण होऊन जाल. वाहन, घर किंवा संपत्ती खरेदी करण्याचा योग जुळून येईल. एखादा अडकलेला जुना व्यवहार पूर्ण होऊ शकतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)