मुंबई : काल धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरूवात झाली. आज दिवाळीचा (Diwali 2023) दूसरा दिवस आहे. दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते, ज्यांच्या कृपेने घरात वर्षभर संपत्ती आणि समृद्धी राहते. ज्योतिषांच्या मते यावेळी दिवाळीत 500 वर्षानंतर दुर्मिळ योगायोग तयार होत आहेत. या योगायोगांमुळे जातकांना धन, समृद्धी, आरोग्य आणि आर्थिक लाभ प्राप्त होतील. जोतिषी पराग कुळकर्णी यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
मराठी दिनदर्शिकेनुसार, या वेळी दिवाळी रविवारी, 12 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल. सनत धर्माच्या अभ्यासकांच्या मते या दिवशी दुर्धारा, हर्ष, उभयचारी योग आणि गजकेसरी योग तयार होत आहेत. असा अद्भुत योगायोग 500 वर्षांनंतर घडत आहे. असा दुर्मिळ योगायोग अत्यंत शुभ मानला जातो. अशा दुर्मिळ संयोगाने लोकांच्या जीवनात आनंद येतो आणि प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात.
ज्योतिषांच्या मते, लक्ष्मी पूजा प्रदोष काळात सूर्यास्ताच्या वेळी अमावस्येला केली जाते. या वेळी अमावस्या तिथी 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:44 पासून सुरू होईल आणि 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:56 पर्यंत चालेल. त्यामुळे यंदा दिवाळीचा सण १२ नोव्हेंबरलाच साजरा होणार आहे.
दिवाळी हा सण देवी लक्ष्मी आणि गणेशाच्या पूजेला समर्पित मानला जातो. ज्योतिषांच्या मते, उत्तम लाभ मिळवण्यासाठी दिवाळीच्या प्रदोष काळात लक्ष्मी-गणेशाची पूजा करावी. यावेळी 12 नोव्हेंबर रोजी प्रदोष काल संध्याकाळी 5:28 पासून सुरू होईल आणि रात्री 8 पर्यंत चालेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)