मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी बदल करत असतो. त्यामुळे राशीचक्रावर त्याचा परिणाम दिसून येतो. पण गोचर कुंडलीसोबत ग्रहांची दृष्टीही महत्त्वाची ठरते. देवगुरु बृहस्पतीने मीन राशीतून मेष राशीत 22 एप्रिल 2023 रोजी प्रवेश केला आहे. या राशीत गुरु ग्रह 1 मे 2024 पर्यंत राहणार आहे. पण असताना काही राशींवर गुरुंची शुभ नवम दृष्टी पडणार आहे. मेष राशीपासून नवव्या स्थानावर धनु रास आहे. या राशीचा स्वामी ग्रह गुरुच असल्याने नवम दृष्टीला आणखी बळ मिळणार आहे. यामुळे तीन राशींच्या जातकांना अचानक धनलाभ किंवा भागोदय होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊयात या राशींबाबत
मेष : सध्या गुरु ग्रह मेष राशीत विराजमान आहे. त्यामुळे शुभ ग्रह त्याची फळं देत असतो. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं या काळात पूर्ण होतील. कारण नवम दृष्टीचा जातकांना फायदा होईल. नोकरी व्यवसायात चांगला लाभ मिळेल.नोकरीत जातकांना पदोन्नती मिळू शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या जातकांना लाभ मिळेल. घरात धार्मिक कार्य पार पडतील.
मिथुन : या राशीच्या जाताकांनाही नवम दृष्टीचा लाभ होईल. देवगुरु बृहस्पतीच्या नवम दृष्टीमुळे जातकांची चांदी होईल. जातकांचं वैवाहिक जीवन सुखी राहील. भागीदारीच्या धंद्यात यश मिळेल. पार्टनरशिपमध्ये एखादा धंदा सुरु करू शकता. अविवाहित जातकांना विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. या काळात आत्मविश्वास वाढेल त्यामुळे कामाचा आवाका झटपट आवरण्यात मदत होईल.
सिंह : देवगुरु बृहस्पतीची नवम दृष्टी जातकांना फायदेशीर ठरणार आहे. सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. त्यात सूर्य आणि गुरु ग्रहामध्ये मित्रत्वाचे संबंध आहेत. गुरु ग्रह पंचम भावात असल्याने या जातकांना उत्तम संततीचा योग आहे. या काळात शुभ बातमी कानावर पडेल. अचानकपणे धनलाभ या काळात होऊ शकतो. धार्मिक कार्यात आवड वाढेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)