मुंबई : नवग्रहांमध्ये बुध ग्रहाला राजकुमाराचा दर्जा देण्यात आला आहे. व्यापार, बुद्धीचा कारक ग्रह म्हणून पाहिलं जातं. बुध ग्रहाचं एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करताच बऱ्याच घडामोडी घडतात. काही शुभ अशुभ योगांची स्थितीही निर्माण होते. सध्या बुध ग्रह सिंह राशीत विराजमान आहे. या राशीत काही दिवस ठाण मांडल्यानंतर बुध ग्रह 1 ऑक्टोबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. एक वर्षानंतर बुध ग्रह आपल्या स्वराशीत येणार आहे. कन्या राशीत प्रवेश करताच भद्र राजयोग तयार होणार आहे.19 दिवस या राशीत वास्तव्य केल्यानंतर 19 ऑक्टोबरला तूळ राशीत प्रवेश करेल.
भद्र राजयोग ज्या कुंडलीत असतो त्यांना भौतिक सुख मिळतं. तसेच व्यवसायात त्यांची पकड मजबूत असते.चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना लाभ मिळणार ते..
कन्या : या राशीच्या जातकांना बुध गोचर फलदायी ठरणार आहे. स्वामी ग्रह असून याच राशीत ठाण मांडणार आहे. तसेच लग्न भावात भद्र राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे तुमची वेगळी अशी छाप समाज मनावर पडेल. तुमच्या वाणीने लोकं प्रभावित होतील. तसेच तुमच्याबाबत इतरांचा आकर्षण वाढलेलं दिसेल. जीवनात या काळात नवीन उंची गाठाल.
मकर : बुध ग्रह या राशीच्या भाग्य स्थानात गोचर करणार आहे. तसेच या राशीच्या सहाव्या स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे भाग्याची साथ मिळेल. तसेच न्यायालयीन प्रकरणात यश मिळताना दिसेल. आपल्या हातून सत्कर्म घडेल. काही धार्मिक कार्यक्रम हातून घडतील. तसेच पैशांची आवकही चांगली राहील.
धनु : कर्मभावात भद्रराजयोग तयार होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना लाभ मिळेल. इंक्रीमेंट आणि प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच ऑफिस सहकाऱ्यांकडून चांगली साथ मिळेल. आपण जे बोलाल तशाच प्रकार काम पूर्ण होत राहील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)