मुंबई : समुद्रशास्त्रानुसार (Samudrashastra), चेहऱ्यावर अनेक खुणा असतात ज्यांचा माणसाच्या जीवनावर वेगवेगळा प्रभाव पडतो. हे शुभ आणि अशुभ दोन्ही असू शकते, पण समुद्रशास्त्रामध्ये जर एखाद्या व्यक्तीच्या गालावर खळी पडत असेल तर असे लोकं खुप भाग्यवान मानले जातात. वास्तविक, समुद्रशास्त्रानुसार असे मानले जाते की ज्यांच्या गालावर खळी असते ते कोणालाही आपल्याकडे आकर्षित करण्यात अव्वल असतात. असे लोकं अत्यंत आकर्षक असतात. जर एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर खळी असेल तर त्याचा कसा फायदा होतो हे आपण सविस्तर जाणून घेऊया.
समुद्रशास्त्रानुसार, खळी असलेले लोकं त्यांच्या पार्टनरसाठी खूप भाग्यवान असतात. असे लोकं आपल्या जोडीदारांना आदर आणि पूर्ण प्रेम देतात. असे लोकं आयुष्यात कधीही आपल्या पार्टनरला फसवत नाहीत.
गालावर खळी असलेल्या लोकांच्या कुंडलीत शुक्राचा प्रभाव असतो. वास्तविक त्यांच्या कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत राहते. त्यांच्या जीवनात शुक्राच्या प्रभावामुळे लोकांमध्ये आदर वाढतो आणि गर्दीत त्यांची ओळख वेगळी बनते.
अशा लोकांना कधीही पैशाची कमतरता नसते आणि ते इतरांच्या मदतीसाठी नेहमी पुढे असतात. इतकंच नाही तर खळी असलेल्या मुलींचं कुठेतरी लग्न झालं तर त्यांना आर्थिक फायदाही होतो.
वैवाहिक जीवनात एखादा मुलगा खळी असलेली मुलगी भेटला तर ती तिच्या पतीला खूप प्रिय असते. नवरा तिचं म्हणणं सगळं मान्य करायला तयार असतो. खळी असलेल्या मुलींच्या खेळकर स्वभावाने पती नेहमीच आनंदी असतात. तर खळी असलेले पुरुष आपल्या पत्नीला नेहमी आनंदी ठेवतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)