शुक्रवारसाठी लकी रंग
Image Credit source: Social Media
मुंबई : रंगांचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव असतो.
राशीनुसार (Astrology) बघितले तर कोणत्या राशीच्या लोकांनी कोणते कपडे घालावेत, यालाही खूप महत्त्व आहे. आठवड्यातील सातही दिवस ग्रहांच्या अनुषंगाने कपडे परिधान केल्याने जीवनात सुख-शांती येते आणि नशीब अधिक बलवान होते. जाणून घेऊ या शुक्रवारी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत आणि त्याचे फायदे काय आहेत.
शुक्रवारी घाला हे कपडे
भगवान शुक्र देव व्यतिरिक्त शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. जर तुम्ही या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे परिधान करत असाल तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल आणि तुमच्या आयुष्यात आनंद, कीर्ती वाढेल. याशिवाय तुम्ही लाल किंवा मरून, गडद आणि निळ्या रंगाचे कपडे घालू शकता, तसेच फुलांचे प्रिंट असलेले कपडेही घालू शकता.
शुक्राच्या साथीने माता लक्ष्मीही राहील प्रसन्न
राशीनुसार शुक्रवारी गुलाबी रंगाचे कपडे परिधान करणे खूप शुभ राहील. या रंगाचे कपडे घातल्यानंतर तुमचे आयुष्य सुरळीत सुरू होईल. जर तुम्ही तुमच्या करिअरबद्दल चिंतित असाल किंवा नोकरी करणार असाल तर या दिवशी गुलाबी किंवा लाल रंगाचे कपडे घाला. असे केल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होईल, तसेच देवी लक्ष्मीचीही तुमच्यावर विधिवत कृपा होईल.
हे करा उपाय
तुम्हाला तुमच्या पत्रिकेत शुक्र बलवान करायचा असेल तसेच तुम्हाला आर्थिक आणि सामाजिक वरदान हवे असेल तर या दिवशी तुम्ही स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. माता लक्ष्मीची विधिवत पूजा करा आणि गरिबांना दान करा. या दिवशी कन्याभोजन आयोजित केल्याने संतोषी मातेचा आशीर्वादही तुमच्यावर राहील आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)