मुंबई : ग्रहांच्या गोचरामुळे अनेकदा शुभ अशुभ योग तयार होतात. चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदल करत असल्याने ग्रहांसोबत युती आघाडी होत असते. चंद्र शुभ ग्रहांसोबत आला की शुभ योग आणि पापग्रहांसोबत आला तर अशुभ योग तयार होतात. ग्रहमंडळात अनेकदा चंद्र गोचर करून एखाद्या राशीत तशी स्थिती निर्माण करत असतो. पण काही वर्षानंतर मेष राशीत गुरु आणि चंद्राची युती होणार आहे. त्यामुळे मेष राशीत गजलक्ष्मी योग तयार होणार आहे. 21 एप्रिलला चंद्र मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 22 एप्रिलला गुरु ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मीन राशीत चंद्र हा गुरुच्या स्वागतासाठी सज्ज असणार आहे. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व वाढणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तीन राशींसाठी गजलक्ष्मी राजयोग फलदायी ठरणार आहे. यामुळे जातकांची आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील.
मेष : या राशीतच गजलक्ष्मी योग तयार होणार असल्याने या जातकांची आर्थिक स्थिती मजबूत राहील. जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ दर्शवत आहे. या काळात नोकरी करणाऱ्या जातकांना फायदा होईल. इन्क्रिमेंटचा महिना असल्याने नक्कीच फायदा होईल. घरात मानसन्मान वाढेल आणि आनंदाचं वातावरण असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं या काळात पूर्ण होतील.
मिथुन : गजलक्ष्मी राजयोगाचा फायदा या राशीच्या जातकांनाही होईल. देवगुरु बृहस्पती आणि चंद्र या राशीच्या 11 व्या स्थानात युती करत आहेत. नोकरी करणाऱ्या जातकांना या स्थितीमुळे आर्थिक पाठबळ मिळेल. व्यावसायिकांना गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. ज्या कामात हात घालाल ते काम पूर्ण होईल. या काळ विवाह जमण्यास अनुकूल आहे.
धनु : गजलक्ष्मी योग या राशीच्या पाचव्या स्थानात तयार होत आहे. त्यामुले जातकांना निश्चितच फायदा होईल. या काळात आर्थिक गणितं झपाट्याने बदलतील. शेअर आणि इतर गुंतवणुकीतून अपेक्षित लाभ मिळेल. या काळात तुमचं उत्पन्न देखील वाढेल. नवी नोकरीची ऑफर या काळात मिळू शकते. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून साथ मिळेल. तसेच विवाह जमण्यास हा काळ अनुकूल आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)