मुंबई : जून महिना सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. जून महिन्यात चार मोठे ग्रह राशी बदल करणार आहेत. सर्वात आधी ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह दोनदा राशी बदल करणार आहे. 7 जून रोजी मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल. त्यानंतर बुध ग्रह वृषभ राशीतून मिथुन राशीत 24 जूनला प्रवेश करेल. ग्रहांचा राजा सूर्य 15 जून रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. यानंतर न्यायदेवता शनिदेव कुंभ राशीत 17 जून रोजी वक्री होतील. तर ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह 30 जून रोजी सिंह राशीत प्रवेश करेल.
जून महिन्यात ग्रहांच्या गोचरामुळे चढ उतार पाहायला मिळणार आहे. ग्रहांच्या स्थितीमुळे पाच राशीच्या लोकांना जून महिना चांगला जाईल. चला जाणून घेऊयात जून महिन्यातील ग्रहमान कोणत्या राशींसाठी फलदायी ठरेल.
मेष : चार ग्रहांच्या राशी बदलामुळे या राशीच्या जातकांना फायदा होणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना लाभ मिळेल. विदेशात नोकरी करण्याची संधी मिळेल. काळजीपूर्वक कामं करा. या काळात चांगल्या लोकांच्या ओळखी होतील. ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे आत्मविश्वास या काळात वाढेल.
मिथुन : ग्रह गोचराचा विद्यार्थ्यांना लाभ मिळेल. मन एकाग्र झाल्याने त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. सूर्य गोचरामुळे नशिबाची चांगली साथ मिळेल. आर्थिक गणितं या काळात सुटतील. मित्र आणि कुटुंबाकडून चांगलं सहकार्य मिळेल. तब्येतीची या काळात काळजी घ्या.
कन्या : जून महिन्यात ग्रहांची चांगली साथ मिळेल. कौटुंबिक संबंध या काळात आणखी दृढ होतील. जोडीदारांचं या काळात चांगलं सहकार्य मिळेल. गुंतणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो. आई वडिलांना तीर्थयात्रेला नेण्याचा योग जुळून येईल. नवीन वाहन खरेदी करू शकता.
तूळ : या राशीच्या जातकांना बऱ्याच कालावधीनंतर ग्रहांची साथ मिळत आहे. या काळात उद्योग व्यवसायात भरभराट होईल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेले पैसे तुम्हाला मिळतील. मुलांची प्रगती पाहून तुम्हाला आनंद वाटेल. जोडीदारासोबत लांबचा प्रवास घडण्याची शक्यता आहे.
मकर : या काळात तुमची प्रगती चांगल्या प्रकारे होईल. उत्पन्नात या काळात वाढ झालेली दिसून येईल. जोडीदारासोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील. न्यायालयीन प्रकरणात तुम्हाला यश मिळेल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या जातकांना यश मिळण्याची शक्यता आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)