गुप्त नवरात्री
Image Credit source: Social Media
मुंबई, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून गुप्त नवरात्रीची (Gupta Navratri 2023) सुरुवात होते. या वर्षी 22 जानेवारी 2023 रविवारपासून गुप्त नवरात्रीला सुरुवात होत आहे. माँ दुर्गेच्या 9 अवतारांच्या विशेष उपासनेचा हा काळ ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असणार आहे. 22 जानेवारी ते 30 जानेवारी हा गुप्त नवरात्रीचा काळ काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. जाणून घेऊया या वेळी कोणत्या राशींना यश आणि संपत्ती मिळेल.
गुप्त नवरात्रीमध्ये या राशींचे चमकेल भाग्य
- मेष : मेष राशीचे जे लोकं नोकरीच्या शोधात आहेत, त्यांची प्रतीक्षा संपेल. दुसरीकडे, नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. नवीन नोकरी मिळू शकते. सहलीला जाता येईल.
- कन्या : नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. नवीन कपडे, दागिने खरेदी करू शकता. व्यवसायात तेजी येईल. कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. तुम्हाला भेटवस्तू मिळू शकतात. एखादी मोठी इच्छा पूर्ण झाल्यास आनंद मिळेल.
- वृश्चिक : कोणतीही सुखद माहिती तुमचे मन प्रसन्न करेल. थांबलेले पैसे मिळतील. आर्थिक लाभामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. सामाजिक कार्यात सक्रिय राहाल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. आनंद कायम राहील.
- मकर : कायदेशीर अडचण होती, ती आता दूर होईल. वाद मिटल्याने मोठा दिलासा मिळेल. कोणत्याही धार्मिक किंवा कौटुंबिक सहलीला जाऊ शकता. आनंदात वेळ जाईल. जीवनात आनंद येईल. धनलाभ होऊ शकतो.
- मीन: तुमच्या बुद्धीमत्तेच्या जोरावर तुम्ही एखादी मोठी समस्या सोडवू शकाल. लाभाची संधी मिळाली तर ती हाताबाहेर जाऊ देऊ नका. एखाद्या खास व्यक्तीकडून मिळालेली मदत तुम्हाला खूप लाभ देईल. व्यवसायात तेजी येईल. संबंध अधिक चांगले होतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)